आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या समेवत बैठक आयोजित केली होती. तसेच या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकी संदर्भात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्या असून, यामध्ये युती करायची का? कुणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू. मनसेची सत्ता आली पाहिजे यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत. असं राज ठाकरेंनी जाहीर केलं. दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. मात्र, यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वेगळी भूमिका घेतली आहे. (Raj Thackeray)
(हेही वाचा – महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 15,554 कोटी Ashwini Vaishnaw यांची माहिती)
राज ठाकरे काय म्हणाले?
मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज ठाकरे म्हणाले की, “विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि घमासान असलेली होणार आहे. या निवडणुकीत मला आपले आमदार निवडून आलेले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. काय घडतं आहे, काय घडू शकतं? याचं आकलन करा. मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकिट मिळेल. तिकिट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कुणालाही तिकिट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल जे सांगाल जे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी नीट माहिती द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी आणि आपले लोक सत्तेत बसावयचे आहेत. अनेक लोक हसतील हसुदेत काही प्रश्न नाही. मात्र हे घडणार म्हणजे घडणार. ” असंही Raj Thackeray यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : भारतीय खेळाडूंना मिळालेल्या अधिकृत किटमध्ये काय काय आहे?)
कोण कुठे गेले, समजत नाही
राज ठाकरे यांनी राज्यातील सध्या राजकारणावर (Politics) भाष्य केले आहे. ”सध्या एकमेकांना केवळ शिव्या दिल्या जातात. त्यानंतर लोकांचे लक्ष विचलित करून निवडणुक भरकटवली जाते. कोण कुठे गेलेलं आहे? कोण कोणत्या पक्षांत आहे? काहीच समजत नाही”, असे विधान ही राज ठाकरे यांनी केले. (Raj Thackeray)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community