Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल आणि दरबार हॉलच्या नावात बदल

176
Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल आणि दरबार हॉलच्या नावात बदल

राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल आणि दरबार हॉलच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार दरबार हॉलला गणतंत्र मंडप असे नाव देण्यात आले आहे. तर अशोक हॉल या नावातील केवळ हॉल बदलून त्याऐवजी मंडप असे करण्यात आले आहे. अशोक हॉलचे नाव बदलताना भाषेतील एकरुपतेचा हवाला देण्यात आला आहे. अशोक मंडप हे नाव भाषेत एकरुपता आणते आणि इंग्रजीकरणाचे अस्तित्व मिटवते. सर्व कष्टातून मुक्त झालेला व्यक्ती किंवा कोणत्याही दुःखाशी न जोडला गेलेला व्यक्ती असा अशोकचा अर्थ आहे. अशोक हे नाव सम्राट अशोक यांच्याशी जोडले गेलेले आहे, जे एकता आणि शांतीचे प्रतिक आहे, असे राष्ट्रपती भवनने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. (Rashtrapati Bhavan)

भारत प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय प्रतिक सारनाथमध्ये अशोक चिन्ह आहे. हा शब्द अशोक वृक्षालाही संदर्भित करतो. त्याचा भारतीय धार्मिक परंपरेसोबतच कला आणि संस्कृतीतही मोठे महत्व आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनकडून देण्यात आले आहे. (Rashtrapati Bhavan)

(हेही वाचा – Raj Thackeray यांचं ठरलं ! पदाधिकारी मेळाव्यात म्हणाले, “विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा स्वबळावर लढणार”)

दरबार हॉलचे महत्त्व

दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. तसेच भवनातील अनेक महत्त्वाचे कार्यक्रमही याच हॉलमध्ये होतात. नावांमधील बदलांबाबत स्पष्टीकरण देताना राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे की, प्रजासत्ताकाची (गणतंत्र) भावना प्राचीन काळापासून भारतीय समाजाच्या मनात रुजली आहे. त्यामुळे दरबार हॉलसाठी गणतंत्र मंडप या जागेसाठी योग्य नाव आहे. (Rashtrapati Bhavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.