Pune Heavy Rain: पूर परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी लष्कराचे १०० जवान दाखल!  

194
Pune Heavy Rain: पूर परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी लष्कराचे १०० जवान दाखल!  
Pune Heavy Rain: पूर परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी लष्कराचे १०० जवान दाखल!  

पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या पावसामध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर कार्यरत आहेत. बरोबरच आता लष्कराचे १०० जवान (Pune 100 military personnel) सुद्धा मदतीला धावून आले आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे. तिथले बचाव कार्य वेगाने सुरु आहे. नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.   (Pune Heavy Rain)

दरम्यान, मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३५,५७४ क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात येणार असल्याचे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. पुन्हा सायंकाळी अशी पूरस्थिती निर्मण होऊ नये, यासाठी २४ मराठा बटालियन औंधचे १०० जवान सिंहगड रोड परिसरात दाखल झाले आहेत.  (Pune Heavy Rain)

(हेही वाचा – Raj Thackeray यांचं ठरलं ! पदाधिकारी मेळाव्यात म्हणाले, “विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा स्वबळावर लढणार”)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्करी जवानांना दिल्या मदतीच्या सूचना 

मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले की, एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलविणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ (NDRF), लष्कर (Army), नौदल (Indian Navy) यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत.  पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाउस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे. पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलीकॉप्टरने कसे त्यांना वाचवता येईल ते पाहण्यास सांगितले आहे. (Pune Heavy Rain)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.