Parliament Session : सुनील तटकरे यांची प्रतिज्ञा; जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत…

165
Parliament Session : सुनील तटकरे यांची प्रतिज्ञा; जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी (२५ जुलै) लोकसभेत केली. (Parliament Session)

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभागी होताना खासदार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांची ही तिसरी टर्म आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी भरपूर मदत दिली आहे. रालोआ सरकारच्या काळात अटल सेतू झाला. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभे झाले आहे, असेही ते म्हणाले. (Parliament Session)

खासदार तटकरे म्हणाले की, मी या देशातील एकमेव असा खासदार आहे ज्याच्या मतदारसंघात चार-चार भारतरत्नांचा जन्म झाला. आता मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. मी हिंदी आणि इंग्रजी भाषेतही बोलू शकतो. परंतु, जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी मराठीतच भाषण करणार, अशी प्रतिज्ञा सुद्धा तटकरे यांनी यावेळी घेतली. (Parliament Session)

(हेही वाचा – आशिष शेलार यांचा Manoj Jarange Patil यांना सवाल; म्हणाले…)

मोदी सरकारला विरोध करण्याचे सोडा

महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. परंतु, मुंबई-गोवा महामार्ग होऊ शकला नाही याची मला खंत आहे. भविष्यात सरकार याकडे लक्ष देईल याची मला खात्री आहे. १९४७ मध्ये हा देश कसा होता, हे आम्हाला माहित नाही. परंतु, भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा अर्थात २०४७ मध्ये भारत विकासाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकल्याशिवाय राहणार नाही. (Parliament Session)

सुनील तटकरे मोदी सरकारचा उदो-उदो करीत होते तेव्हा समोरच्या बाकावर बसलेले उबाठाचे उद्धव ठाकरे यांनी ‘दोन पदकवीर’ या मथळ्याची बातमी असलेला पेपर दाखविला. यावर तटकरे म्हणाले की, ‘अरविंदजी मोदी सरकारच्या काळात फक्त दोनच पदकवीर आहेत असे अजिबात नाही. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा पदकवीर आहेत. यामुळे, आता तरी मोदी सरकारला विरोध करण्याचे सोडा आणि सरकारचे कौतुक करा’. मुळात अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशला झुकते माप दिल्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे दोनच पदकवीर असल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. अरविंद सावंत यांनी हीच बातमी दाखविली. (Parliament Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.