मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ७०० च्या घरात आलेली असून, रविवारी दिवसभरात ७०० रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ७०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात १९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
अशी आहे रुग्ण संख्या
शनिवारी मुंबईत संपूर्ण दिवसभरात जिथे ७३३ रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी ७०० रुग्ण आढळून आले आहेत. तर संपूर्ण दिवसभरात ३० हजार १३७ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत रविवार पर्यंत १५ हजार १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शनिवारी जिथे १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे रविवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १५ पुरुष आणि ४ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांखाली २ रुग्णांचा समावेश असून, ६० वर्षांवरील १० रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ७ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
१३ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ७००
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ७०४
बरे झालेले एकूण रुग्ण – ६८३३८२
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १५७७३
दुप्पटीचा दर- ६५३ दिवस
कोविड वाढीचा दर ( ६ जून ते १२ जून)- ०.१० % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 13, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ६५३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही २२ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community