भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करुन देणारा Kargil Vijay Divas

162
भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करुन देणारा Kargil Vijay Divas

कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतामध्ये दरवर्षी २६ जुलै या दिवशी साजरा केला जातो. याच दिवशी १९९९ आली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये कारगिल टेकडीवर युद्ध झालं होतं. हे युद्ध सुमारे ६० दिवसांपासून सुरू राहिलं होतं आणि २६ जुलैच्या दिवशी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून या युद्धाचा शेवट केला होता. म्हणूनच कारगिल विजय दिवस हा त्या युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो. (Kargil Vijay Divas)

(हेही वाचा – Ashwini Vaishnav : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी १५,९४० कोटींची तरतूद)

१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतरही कित्येक दिवस लष्करी चकमकी सुरूच राहिल्या होत्या. इतिहासातल्या नोंदणीनुसार दोन्ही देशांनी केलेल्या अणुचाचणीमुळे सीमेवर तणाव आणखी वाढला होता. ही परिस्थिती शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ साली लाहोर येथे एका कारारावर स्वाक्षरी केली. या करारामध्ये काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय चर्चा करून शांतपणे सोडवण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. (Kargil Vijay Divas)

पण पाकिस्तानने हा करार मोडून आपलं सैन्य आणि निमलष्करी दल गुप्तपणे सीमारेषा ओलांडून पाठवायला सुरुवात केली. या घुसखोरीला ‘ऑपरेशन बद्र’ असं नाव देण्यात आलं होतं. काश्मीर आणि लडाखमधील दुवा तोडून भारतीय सैन्याला सियाचीन ग्लेशियरवरून हटवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. पाकिस्तानला असाही विश्वास होता की, या प्रदेशातल्या सीमेवर तयार झालेल्या कोणत्याही प्रकारच्या तणावामुळे काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मुद्दा बनण्यास मदत होईल. (Kargil Vijay Divas)

(हेही वाचा – Pune Heavy Rain: पूर परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी लष्कराचे १०० जवान दाखल!  )

सुरुवातीला असं वाटलं होतं की, ही घुसखोरी आहे. काही दिवसातच आपलं सैन्य त्यांना हुसकावून लावेल असा दावा केला जात होता. पण नियंत्रण रेषेवर अधिक शोध घेतल्यानंतर या घुसखोरी मागची पाकिस्तानची पूर्वनियोजित रणनीती भारतासमोर उघडकीस आली. त्यामुळे भारतीय लष्कराच्या असं लक्षात आलं की, ही फक्त घुसखोरी नसून हा भारतावर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर युद्धाचं नियोजन केलं आहे. (Kargil Vijay Divas)

पाकिस्तानचं हे षडयंत्र लक्षात आल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन विजय या नावाने कारगिल या भागामध्ये आपले २,००,००० सैनिक पाठवले होते. २६ जुलै १९९९ साली हे सुमारे साठ दिवस सुरू असलेलं युद्ध अधिकृतपणे संपलं. या युद्धामध्ये आपल्या ५२७ भारतीय सैनिकांनी प्राणांचं बलिदान दिलं होतं आणि सुमारे १४०० सैनिक जखमी झाले होते. म्हणून कारगिल युद्धामध्ये भाग घेतलेल्या या सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ दरवर्षी २६ जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस भारतभर साजरा केला जातो. (Kargil Vijay Divas)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.