Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकमध्ये ओपनिंग सेरेमनीआधी मोठा राडा; ८ लाख लोकं अडकली रेल्वे स्थानकांवर

258
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकमध्ये ओपनिंग सेरेमनीआधी मोठा राडा; ८ लाख लोकं अडकली रेल्वे स्थानकांवर
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकमध्ये ओपनिंग सेरेमनीआधी मोठा राडा; ८ लाख लोकं अडकली रेल्वे स्थानकांवर

भारतासह संपूर्णं देशांचं लक्ष लागून असलेल्या ऑलिंपिक 2024 (Paris Olympics 2024) चा खेळ सुरू होण्यापूर्वी एक घटना घडली आहे. या घटनेमध्ये पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीच्या काहीतास आधी फ्रान्समध्ये मोठा राडा झाला आहे. जाणीवपूर्वक हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला लक्ष्य करण्यात आलं. रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आले असून, या हिंसाचारामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टिमवर मोठा परिणाम झाला आहे. हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. तसेच अनेक ट्रेन 90 मिनिटे उशिराने धावत आहेत. या हल्ल्यामुळे जवळपास 8 लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत. शुक्रवार 26 जुलैपासून फ्रान्सची (france) राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. फ्रान्सची ट्रेन ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने (SNCF) शुक्रवारी न्यूज एजन्सी AFP ला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवर (France’s high-speed railway Network attack) हल्ला करुन जाळपोळ करण्यात आली असं एसएनसीएफकडून सांगण्यात आलं. (Paris Olympics 2024)

(हेही वाचा – मंत्रीजी, हात खिशातून बाहेर; लोकसभा अध्यक्ष Om Birla भडकले)

यावेळी तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. ट्रेन नेटवर्कला पंगु बनवण्यासाठी करण्यात आलेला हा मोठा हल्ला आहे. यामुळे अनेक ट्रेन्स रद्द कराव्या लागल्या असं तपास करणाऱ्या एका सूत्राने AFP ला सांगितलं. पॅरिसमध्ये भव्य ऑलिम्पिक सेरेमनीची तयारी सुरु असताना हे हल्ले करण्यात आले. ओपनिंग सेरेमनीमध्ये 7 हजार 500 एथलीट, 3 लाख प्रेक्षक आणि व्हीआयपी हे सहभागी होणार आहेत.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकमध्ये अगदी दुसऱ्या फेरीतही आमनेसामने येऊ शकतात नदाल आणि जोकोविच )

ओपनिंग सेरेमनीला बसू शकतो हवामानाचा फटका?

या हल्ल्यामुळे 8 लाख ट्रेन प्रवासी प्रभावित झालेत, असं एसएनसीएफ समूहाच्या अध्यक्षांनी बीएफएमटीवीला सांगितलं. france24.com च्या रिपोर्ट्नुसार यूरोस्टार (Eurostar) (रेलवे कंपनी) ने सांगितलं की, लंडन आणि पॅरिस दरम्यान तोडफोडीच्या घटनांमुळे रेल्वे सेवा बाधित झाली आहे. अनेक ट्रेन्स रद्द (France trains cancel) झाल्या. प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढला. सीन नदी किनारी ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी होणार आहे. यावेळी हवामानाचा फटका बसू शकतो. हवामान विभागाने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुपारी हवामान स्वच्छ राहिलं. संध्याकाळी पाऊस कोसळू शकतो. याचवेळी ओपनिंग सेरेमनी होणार आहे. (Paris Olympics 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.