- ऋजुता लुकतुके
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा ८० मिनिटांच्या भाषणात रेल्वे हा शब्दच मूळी फक्त दोनदा आला. यातील एकदा गेल्यावर्षीच्या रेल्वेच्या तुरतुदी यंदाही कायम राहतील असं त्या म्हणाल्या. रेल्वे क्षेत्राला काही नवीन आणि ठोस आश्वासन नसल्यामुळे मग रेल्वे शेअरमध्ये मागच्या दोन दिवसांत चांगलीच घसरण पाहायला मिळाली आहे. यातीलच एक कंपनी आहे इरकॉन इंटरनॅशनल. इरकॉन कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारीही जवळ जवळ ३.४५ टक्क्यांची घसरण होऊन हा शेअर १८२ वर बंद झाला. (IRCON Share Price Highlights)
अर्थात, मागच्या १२ ते १५ महिन्यात रेल्वे योजनांना सरकारने दिलेल्या प्रोत्साहनांमुळे रेल्वे शेअर हे आधीच तेजीत होते. त्यामुळे आताची घसरण ही नफारुपी विक्री असल्याचंही मानलं जातंय. इरकॉन कंपनीच्या शेअरमध्ये मागच्या ५ दिवसांतही ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. (IRCON Share Price Highlights)
(हेही वाचा – Adani Gas Share Price : अदानी टोटल गॅस शेअर हिंडेनबर्ग अहवालाच्या धक्क्यातून सावरला?)
इरकॉन ही कंपनी यासाठी झाली स्थापन
आठवड्याच्या सुरुवातीला इरकॉन कंपनीने ३५१ रुपयांपर्यंतची मजल गाठली होती. पण, आता वर्षभराच्या रॅलीनंतर हा रेल्वे शेअरही मूल्यांकनाच्या बाबतीत महाग झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इरकॉन हा शेअर प्राईस-टू-अर्निंग गुणोत्तरात १२ पट पुढे आहे. तर पाच वर्षांची सरासरीही १२.८ पटींनी जास्त आहे. (IRCON Share Price Highlights)
२०१८ च्या अर्थसंकल्पापासून आतापर्यंत रेल्वेसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद २.६ पटींनी वाढली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये यात थोडी स्थिरता येणंच अपेक्षित होतं. तसाच प्रतिसाद रेल्वे कंपन्यांना आता दिसत आहे. इरकॉन ही सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे कंपनी असून रेल्वे वाहतूकीसाठीच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ती स्थापन झाली आहे. रेल्वेसाठी पायाभूत सुविधा उभारणीत अभियांत्रिकी कामं ही कंपनी करते. (IRCON Share Price Highlights)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community