मिठी नदीच्या पात्रात BKC मध्ये ८ फुटांची आढळली मगर

मगर दिसून येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

322

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी देखील साचले, तर मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. याच मिठी नदीच्या पात्रात बीकेसी (BKC) येथे एक ८ फुटांची मगर आढळून आली आहे.

(हेही वाचा Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकमध्ये ओपनिंग सेरेमनीआधी मोठा राडा; ८ लाख लोकं अडकली रेल्वे स्थानकांवर)

वन अधिकाऱ्यांनी सावधगिरीचे आवाहन केले

मगर दिसून येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ‘मिठी’च्या पात्रात मगर आढळून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. याची माहिती तातडीने वाइल्डलाइफ अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेक्स्क्यू असोसिएशनला (RAWW) देण्यात आली. असोसिएशनचे सदस्य अतुल कांबळे यांनी या दृश्याची पुष्टी केली आणि वन नियंत्रण कक्षाला सुचित केले. वन अधिकाऱ्यांनी सावधगिरीचे आवाहन केले असून रहिवाशांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे आश्वस्थ केले आहे. बीकेसी (BKC) परिसर बिझनेस हब म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक बड्या कंपन्यांची कार्यालये असून दररोज लाखो कर्मचारी या परिसरात कामानिमित्त येतात. तसेच जवळच रहिवासी भाग देखील आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.