Jalgaon Crime : पोलीस हवालदाराला ५० हजारांची लाच भोवली

173
Jalgaon Crime : पोलीस हवालदाराला ५० हजारांची लाच भोवली

वाळू वाहतुकीचा व्यवसाय करताना कारवाई न करण्यासाठी दोन लाख ६० हजारांची मागणी करत तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला जळगाव येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Jalgaon Crime)

किरण रवींद्र पाटील (वय ४१, रा. भडगाव) असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे भडगाव शहरातील रहिवाशी आहे. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. यापूर्वी तक्रारदारावर भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत दोन गुन्हे दाखल आहे. दरम्यान, तक्रार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. (Jalgaon Crime)

(हेही वाचा – Road Potholes : खड्डे बुजवण्यात कुचराई, कंत्राटदारांना आतापर्यंत ठोठावला ५० लाखांचा दंड)

दरम्यान, याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. शुक्रवारी, २६ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सापळा रचला. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील याने तक्रारदाराकडे दोन लाख ६० हजारांची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले आहे. (Jalgaon Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.