MSRTC Bus: एसटी महामंडळाला विठूराया पावला; वारी काळात कोट्यवधींची कमाई

154
MSRTC Bus: एसटी महामंडळाला विठूराया पावला; वारी काळात कोट्यवधींची कमाई
MSRTC Bus: एसटी महामंडळाला विठूराया पावला; वारी काळात कोट्यवधींची कमाई

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) लाखो वारकरी एसटीने पंढरपूरात (Pandharpur) विठूरायांचं दाखल झाले होते. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीमुळे वारकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांचा ही समावेश होता. दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून एसटी महामंडळाचे २८ कोटी ९२ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. दरम्यान याच काळात एसटी महामंडळाकडून ५ हजार बसेस सोडण्यात आले होते. याच बसेसमधून १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार भाविक प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला.  (MSRTC Bus)

(हेही वाचा – Hawkers Policy : नगरपथ विक्रेता समिती निवडणूक, महिला आरक्षण सोडत येत्या सोमवारी)

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. (MSRTC Bus)

(हेही वाचा –President Draupadi Murmu २८ जुलै रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर; या मार्गत होणार बदल)

सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द

प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे. (MSRTC Bus)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.