राहुल बोस हे एक भारतीय अभिनेते आणि ऍथलीट आहेत. ते मुख्यत्वे हिंदी आणि बंगाली चित्रपटांत काम करतात. राहुल बोस हे भारतीय रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्षही आहेत. राहुल बोस यांचे मिस्टर अँड मिसेस अय्यर, कालपुरुष, अनुरानन, अंतहीन, लॅपटॉप आणि द जॅपनीज वाइफ हे बंगाली भाषेतले चित्रपट प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी प्यार के साइड इफेक्ट्स, मान गए मुगल-ए-आझम, झंकार बीट्स, कुछ लव जैसा, दिल धडकने दो, चमेली आणि शौर्य यांसारख्या हिंदी भाषिक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (Rahul Bose)
२०१३ साली प्रदर्शित झालेला तमिळ भाषेतला थ्रिलर चित्रपट विश्वरूपम आणि त्याच्या सिक्वेलमध्ये राहुल बोस यांनी खलनायकाची भूमिका देखील निभावली आहे. टाईम्स मॅगझीनने तर त्यांना “भारतीय आर्टहाऊस सिनेमाचा सुपरस्टार” अशी उपाधी दिली आहे. तर मॅक्सिमने त्यांना इंग्लिश, ऑगस्ट आणि मिस्टर अँड मिसेस अय्यर यांसारख्या समांतर चित्रपटांमध्ये काम केल्याबद्द “ओरिएंटल सिनेमांचा शॉन पेन” असं संबोधलं आहे. (Rahul Bose)
(हेही वाचा – President Draupadi Murmu २८ जुलै रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर; या मार्गत होणार बदल)
राहुल बोस हे समाजकार्यातही सक्रिय आहेत. त्यांनी त्सुनामी येऊन गेल्यानंतर मदत कार्यात भाग घेतला होता. तसंच राहुल बोस हे अँटीडिस्क्रिमीनेशन एनजीओ द फाउंडेशनचे संस्थापकही आहेत. राहुल बोस यांच्या जन्म २७ जुलै १९६७ साली झाला. त्यांच्या वडिलांचं नावं रुपेन आणि आईचं नाव कुमुद असं होतं. राहुल बोस हे लहानपणापासूनच शाळेतल्या नाटकांमध्ये अभिनय करायचे. त्यांना खेळांचीही खूप आवड होती. ते बॉक्सिंग, रग्बी आणि क्रिकेटही खेळायचे. माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी हे त्यांचे कोच होते. (Rahul Bose)
राहुल बोस यांनी सिडनहॅम कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना ते कॉलेजच्या रग्बी संघातून खेळायचे. त्यांनी वेस्टर्न इंडिया चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता. तसंच त्यांनी बॉक्सिंगमध्येही रौप्य पदक जिंकलं होतं. १९८७ साली त्यांची आई गेल्यानंतर राहुल बोस यांनी रेडिफ्यूजन येथे कॉपीरायटर म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांची ऍडव्हर्टिज क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून बढती झाली. राहुल बोस यांनी आपला पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पूर्णवेळ अभिनेता म्हणून काम करण्यासाठी नोकरी सोडली. (Rahul Bose)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community