Narayan Rane यांचा राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार; म्हणाले…

155

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू नये,नअशा शब्दांत शुक्रवारी (२६ जुलै) भाजपाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोरदार प्रहार केला. (Narayan Rane)

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. तरी प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा सापत्न भाव न बाळगता महाराष्ट्रासह सर्व राज्यांसाठी भरभक्कम अशी तरतूद करून देशाला प्रगतीपथावर नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे असे सांगत त्यांनी ठाकरे व विरोधकांना सणसणीत चपराक दिली. (Narayan Rane)

खा. राणे म्हणाले की, या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही, अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पाबाबत तोकडे ज्ञान असलेल्या ठाकरेंकडून येणे अपेक्षितच होते. कारण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना स्वत:च त्यावेळी अर्थसंकल्पाबाबतच्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाची कबुली भर विधानसभेत बोलताना दिली होती. तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती अशी खिल्ली उडवत हा अर्थसंकल्प युवक, शेतकरी, महिला व गरीब अशा समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा, गरीब शेतकऱ्यांना लाभ देणारा, युवकांना रोजगाराच्या अगणित संधी देणारा, दलित-मागास वर्गाला सशक्त करणारा, छोटे व्यापारी, लघु उद्योग यांना बळ देणारा, मध्यमवर्ग, उद्योजक यांना सक्षम करणारा आहे असे ठासून सांगत त्यांनी या अर्थसंकल्पाचे ठामपणे समर्थनही केले. (Narayan Rane)

(हेही वाचा – President Draupadi Murmu २८ जुलै रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर; या मार्गत होणार बदल)

राणेंनी लगावला ‘हा’ सणसणीत टोला 

यंदाचा अर्थसंकल्प हा ४८ लाख २१ हजार कोटींचा असून मागील अर्थसंकल्पापेक्षा ३ लाख कोटींनी अधिक असून या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही असा सूर आळवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी ठाकरे सरकारच्या काळातील अर्थसंकल्पातील आकड्यांचा सोयीस्कररित्या विसर पडल्याची टीका केली. उद्धव ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातल्या तरतुदी, तुटीचे आकडे खा. राणे यांनी वाचून दाखविले. ठाकरे सरकारच्या काळातील दोन अर्थसंकल्पातील राजकोषीय तुटीचे आकडे सर्वांसमोर मांडत तूट काय असते हे देखील ठाकरे यांना बहुदा माहित नसावे अशी खोचक टिप्पणीही राणे यांनी केली. उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलताच येत नाही. विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल तर मी अर्थसंकल्पाचे टिपण देईन असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. (Narayan Rane)

आपले अर्थसंकल्पाबाबतचे अज्ञान पाजळत काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या अर्थसंकल्पावर टीका केली असल्याचे सांगत, खरंतर मोदी सरकारने मागच्या १० वर्षांत अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत समाजातील शेवटच्या घटकाला लाभार्थी बनवून दाखवले. जागतिक बलाढ्य अशा अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून ५ व्या क्रमांकावर आणल्याचेही राणे त्यांनी ठामपणे नमूद केले. (Narayan Rane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.