देशात ‘सॅटेलाईट टोल कलेक्शन प्रणाली’ येणार; Nitin Gadkari यांची घोषणा

176
गणेशभक्तांचा कोकण प्रवास करणार खड्डेमुक्त; Nitin Gadkari यांचे वायकरांना आश्वासन

देशात वर्तमानात सुरू असलेली टोल प्रणाली बंद होणार आहे. त्याऐवजी देशात ‘सॅटेलाईट टोल कलेक्शन प्रणाली’ येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली. (Nitin Gadkari)

यासंदर्भात नितीन गडकरी म्हणाले की, सध्याची टोल प्रणाली बंद करत आहे. लवकरच सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन प्रणाली सुरू करण्यात येईल. याचा उद्देश, टोल कलेक्शन वाढवणे आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करणे असा आहे. राज्यसभेतही एका लेखी उत्तरात गडकरी म्हणाले होते की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) कार्यान्वित करणार आहे. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Narayan Rane यांचा राहुल गांधी, उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार; म्हणाले…)

मात्र, ही व्यवस्था सध्या केवळ काही निवडक टोल प्लाझांवरच सुरू होईल. यापुढे सॅटेलाइटच्या माध्यमाने टोल वसूल केला जाईल. आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि आपण जेवढे अंतर कापाल, त्यानुसार पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल असे गडकरी यांनी सांगितले. (Nitin Gadkari)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.