Local Train Stunt: धावत्या लोकलमधून धोकादायक स्टंट करणं बेतलं जीवावर; ‘त्या’ व्हायरल तरुणासोबत घडलं असं काही…

320
Local Train Stunt: धावत्या लोकलमधून धोकादायक स्टंट करणं बेतलं जीवावर; 'त्या' व्हायरल तरुणासोबत घडलं असं काही...
Local Train Stunt: धावत्या लोकलमधून धोकादायक स्टंट करणं बेतलं जीवावर; 'त्या' व्हायरल तरुणासोबत घडलं असं काही...

मुंबई लोकलमध्ये काही टवाळखोर स्वत:च्या जीवाबरोबरच इतरांचा जीव धोक्यात टाकत स्टंटबाजी (Local Train Stunt) करताना दिसतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. या व्हिडीओमध्ये तरुण धावत्या लोकल ट्रेनच्या दाराला लटकून प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत होता. मात्र त्याला ही स्टंटबाजी चांगलीच अंगलट आल्याची दिसते आहे.

स्टंटच्या नादात या तरुणाने हात-पाय गमावले आहेत. थोडक्यात बचावलेल्या या तरुणाने इतरांना रेल्वेत स्टंट न करण्याचे आवाहन केले आहे. लोकल पूर्ण वेगात असताना दरवाजा पकडून संपूर्ण फलाटावर पाय घासण्याचा ‘स्टंट’ची चित्रफीत ‘एक्स’वर १४ जुलै रोजी व्हायरल झाली होती. हा जिवघेणा स्टंट शिवडी स्थानकातील असल्याचे निश्चित झाल्यावर वडाळा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अज्ञातावर गुन्हा दाखल करून स्टंटबाजाचा शोध सुरू केला. स्टंटबाज तरुणाचा शोध घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने स्वतंत्र पथक नेमले. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टंटबाजाचे नाव फरहत आझम शेख असून, तो वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात राहत असल्याची माहिती ‘आरपीएफ’ला मिळाली. (Local Train Stunt)

कारवाई करण्यासाठी ‘आरपीएफ’चे पथक फरहतच्या घरी गेले असता अंथरूणावर दयनीय अवस्थेत पाहून आरपीएफ कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. आरपीएफने फरहतकडे विचारणा केल्यावर शिवडी स्थानकातील व्हायरल स्टंट आपणच कबुली फरहतने दिली. ‘७ मार्च रोजी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये स्टंट केला. समाजमाध्यमांवर लाईक्स मिळवण्यासाठी मित्राने रेकॉर्डिंग केले होते. पहिला स्टंट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि भरपूर लाईक्सही मिळाले. यामुळे १४ एप्रिलला मशिद स्थानकांवर दुसरा स्टंट केला. हा स्टंट करताना अपघात झाला आणि डावा हात-पाय गमावला.’ असे फरहतने आरपीएफ कर्मचाऱ्यांना सांगितले. (Local Train Stunt)

मशिद स्थानकांवर झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यामुळे जीव बचावला. मात्र हात-पाय कायमस्वरूपी गेले, असे फरहतकडून ऐकल्यावर कारवाईसाठी गेलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याचा केवळ कबुली जबाब घेतला. तसेच त्याने रेल्वेत स्टंट न करण्याचे आवाहन तरुणांना केले आहे. (Local Train Stunt)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.