Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘या’ खेळाडूंकडून भारताला आहे पदकांची आशा

176
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘या’ खेळाडूंकडून भारताला आहे पदकांची आशा
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘या’ खेळाडूंकडून भारताला आहे पदकांची आशा
  • ऋजुता लुकतुके

भारताचे ११७ खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. नेमबाजांपासून नेहमीप्रमाणे स्पर्धेची सुरुवात होणार आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये टोकयोत भारतीय पथकाने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली होती. आता ही संख्या दहावर जाईल, अशी शक्यता आहे. कुठले खेळ आणि कोणत्या खेळाडूंकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे ते पाहूय, (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Mumbai Local Megablock: घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!)

नीरज चोप्रा – टोकयो ऑलिम्पिकचा सुवर्ण विजेता. त्या स्पर्धेनंतर झालेली डायमंड्स लीग, विश्वविजेतेपद अशा सगळ्याच स्पर्धांत सुवर्ण पदक आपल्या नावावर करणारा नीरज चोप्रा टोकयोनंतरच्या त्याच्या फॉर्ममुळेही पदकांचा पहिला दावेदार आहे. भालाफेकीत ९० मीटरचा पल्ला गाठण्याची जिद्द तो बाळगून आहे. फक्त पायाच्या स्नायूला अलीकडे झालेली दुखापत त्याच्या मार्गात आडवी आली नाही तर सलग दुसरं ऑलिम्पिक पदक तो जिंकू शकतो. (Paris Olympic 2024)

निखत झरीन – निखत झरीनला ५० मीटर मुष्टियुद्ध स्पर्धेत स्वत:ची जागा निर्माण करायला थोडं झगडावं लागलं. पण, आता या वजनी गटात मागची दोन वर्षं तिचाच डंका आहे. सलग दोन विश्वविजेतेपदं तिने जिंकली आहेत. टोकयोमध्येही तिच्याकडून पदकाचीच अपेक्षा आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Local Train Stunt: धावत्या लोकलमधून धोकादायक स्टंट करणं बेतलं जीवावर; ‘त्या’ व्हायरल तरुणासोबत घडलं असं काही…)

सात्विकसाईराज रंकीरेड्डी – चिराग शेट्टी – मागच्या ३ वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सात्विकसाईराज आणि चिराग ही जोडी बॅडमिंटनमध्ये मोठी झेप घेण्यासाठी सिद्ध झालेली दिसत आहे. दोनदा त्यांनी दुहेरीतील अव्वल मानांकन मिळवलं आहे. १००० रेटिंग गुणांची स्पर्धा जिंकणं असो की, आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्ण, त्यांनी यंदा सगळंच जिंकलं आहे. पॅरिसमधील जलद कोर्ट त्यांच्या खेळाला साजेशीच आहेत. आता गरज आहे ती ऑलिम्पिकमध्ये सातत्यपूर्ण खेळाची. (Paris Olympic 2024)

पी व्ही सिंधू – सिंधूने तिसऱ्या ऑलिम्पिक पदकाची जय्यत तयारी केली आहे. मागचे काही दिवस ती फक्त आणि फक्त या पदकाविषयीच बोलत आहे. तिचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक प्रकाश पदुकोण यांनी तिच्यावर मेहनत घेतली आहे. दुखापत आणि त्यानंतरचा घसरलेला खेळ यामुळे पदकाच्या शर्यतीत सध्या ती नाहीए. पण, तिचा अनुभव आणि जिद्द याच्या जोरावर ती बाजी कधीही आपल्या बाजूने पालटवू शकते. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : भारतीय संघाचं पॅरिसमधील शनिवारचं वेळापत्रक)

अंतिम पनधळ – ५३ किलो वजनी गटातील ही मल्ल पदकाची दावेदार आहे. कुस्तीमध्ये मागची दोन वर्ष ही खेळाडूंच्या आंदोलनाने गाजली. पण, त्या धामधुमीतही ऑलिम्पिक पात्रता मिळवणारी ती पहिली कुस्तीपटू होती. तिने वर्षभरात जिथे जिथे म्हणून सहभाग नोंदवला तिथे तिथे तिने पदक जिंकलं आहे. अगदी विश्व अजिंक्यपद स्पर्धाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही ती अंतिम फेरीपर्यंत नक्कीच जाऊ शकते. (Paris Olympic 2024)

अमन सेहरावत – पुरुषांमध्ये अमन सेहरावतकडून पदकाची अपेक्षा आहे. वी दाहियाला मागे टाकून त्याने ५७ किलो फ्रीस्टाईल गटात ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. आशियाई स्तरावर त्याने दोन सुवर्ण जिंकली आहेत. आणि त्याचा सध्याचा फॉर्म बघता तो पदक नक्कीच मिळवू शकतो. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Women’s Asia Cup 2024 : बांगलादेशला १० गडी राखून हरवत भारतीय महिला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत)

सिफ्त कौर सामरा – पंजाबची २२ वर्षीय सिफ्त ही भारताची नेमबाजीतील आशा म्हणून ओळखली जाते. तिचा शुटिंग रेंजमधील शांत आणि धीरगंभीरता भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावते. तिची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा असली तरी ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात ती पदकाची दावेदार आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात तिने नवीन विश्वविक्रमही रचला आहे. त्यामुळे तिच्याकडून सरस खेळाच्या अपेक्षा असतील. (Paris Olympic 2024)

मनू भाकर – टोकयोमध्ये तिची पिस्तुल ऐनवेळी बिघडली आणि रडवेल्या चेहऱ्याने मनूला रेंज सोडावी लागली होती. यावेळी तीन वेगवेगळ्या प्रकारात ती उतरणार आहे. २५ मीटर एअर पिस्तुल, १० मीटर एअर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक. २२ वर्षीय मनू भारताची अव्वल पिस्तुल नेमबाज आहे. जसपाल राणा तिचे प्रशिक्षक झाल्यापासून तिने कामगिरीत मोठी मजल मारली आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या)

पुरुषांचा तिरंदाजी रिकर्व्ह संघ – तरुणदीप राय, धीरज बोमादेवरा आणि प्रवीण जाधव हे तिघे नेमबाज उपउपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. आणखी दोन सामने जिंकले तर पदक निश्चित होणार आहे. तेवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. अलीकडेच विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य दक्षिण कोरियाला हरवून त्यांनी सुवर्ण जिंकलं होतं. त्यामुळे हा संघ ऑलिम्पिकमध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतो. (Paris Olympic 2024)

पुरुषांचा हॉकी संघ – टोकयोमध्ये पुरुषांच्या हॉकी संघाने ४० वर्षांचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपवत कांस्य पदक जिंकलं होतं. त्या पाठोपाठ होआंगझाओमध्ये त्यांनी आशियाई सुवर्ण जिंकलं. आता जमून आलेला हा संघ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदकविजेती कामगिरी करणार का आणि पदकाचा रंग यावेळी बदलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.  (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.