जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शनिवारी (२७ जुलै) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. जवान कामकरी भागात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. कामकरी भागात पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेल्याची शक्यता आहे. अतिरिक्त सैनिक पाठवून शोध घेतला जात आहे.
(हेही वाचा –Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या)
जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात सुमारे ४० ते ५० पाकिस्तानी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झालेले दहशतवाद्यांकडे नाईट व्हिजन उपकरणं आणि अमेरिकन बनावटीच्या M4 कार्बाइन रायफल्ससह आधुनिक शस्त्र आहेत.
(हेही वाचा –Local Train Stunt: धावत्या लोकलमधून धोकादायक स्टंट करणं बेतलं जीवावर; ‘त्या’ व्हायरल तरुणासोबत घडलं असं काही…)
जुलै 2024 मध्ये आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 9 मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. एकूण 13 जवान हुतात्मा झाले, तर सुरक्षा जवानांनी 12 दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील कोवुत भागात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले नॉन-कमिशन्ड ऑफिसर दिलावर सिंह यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार केले. मंगळवारी पुंछमध्ये चकमक झाली, ज्यात लान्स नाईक सुभाष कुमार हुतात्मा झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community