Paris Olympic 2024 : भारतीय संघासाठी महत्त्वाची ऑलिम्पिक आकडेवारी

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकला सुरुवात होत असताना भारतीय पथकाविषयी काही गोष्टी जाणून घेऊया आकड्यांमधून 

171
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी रितिका हूडावर सगळ्यांची नजर 
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी रितिका हूडावर सगळ्यांची नजर 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) मोहीम शनिवारपासून सुरू होतेय. १८९६ साली अथेन्समध्ये पहिलं वहिलं ऑलिम्पिक पार पडलं त्यानंतर ही मोहीम खूपच पुढे गेली आहे. भारतीय संघाने सांघिक आणि वैयक्तिक क्रीडाप्रकारात आतापर्यंत ३५ पदकं जिंकली आहेत. सर्वाधिक ८ सुवर्ण हॉकी या खेळात भारताने मिळवली आहेत. तर नेमबाजी आणि ॲथलेटिक्स या प्रकारात वैयक्तिक सुवर्ण पदकं भारताच्या नावावर जमा आहेत. सर्वाधिक पदकं कुस्ती या प्रकारात भारताने मिळवली आहेत. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Women’s Asia Cup 2024 : बांगलादेशला १० गडी राखून हरवत भारतीय महिला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत)

आता यंदा सहभागी झालेल्या संघाविषयीची आकडेवारी पाहूया,

यंदा ११७ खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

यातील ७० पुरुष असून ४७ महिला आहेत.

खेळाडूंबरोबर १४४ जणांचा सपोर्ट स्टाफही आहे.

एकूण ६९ क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय संघ सहभागी होईल.

४४ वर्षीय रोहन बोपान्ना संघातील वयाने सगळ्यात मोठा क्रीडापटू आहे.

१४ वर्षीय कर्नाटकचा जलतरणपटू धिनिधी देसिंगू हा वयाने सगळ्यात लहान क्रीडापटू आहे.

भारतीय संघात २४ क्रीडापटू हरयाणा राज्यातील आहेत.

नीरज चोप्रा (Neeraj Chopra), मीराबाई चानू (Mirabai Chanu), पी व्ही सिंधू (P.V. Sindhu), लवलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain) आणि पुरुषांचा हॉकी संघ यांनी आधीच्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं आहे (Paris Olympic 2024)

पी व्ही सिंधू रिओमध्ये रौप्य व टोकयोत कांस्य पदक जिंकून आता पदकांची हॅट ट्रीक करण्यासाठी सिद्ध झाली आहे.

(हेही वाचा- Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या)

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा भारतीय संघ 

खेळ

महिला

पुरुष

एकूण

तिरंदाजी

ॲथलेटिक्स

११

१८

२९

मुष्टियुद्ध

बॅडमिंटन

घोडेसवारी

गोल्फ

हॉकी

१९

१९

ज्युदो

रोइंग

नेमबाजी

११

१०

२१

जलतरण

सेलिंग

टेबलटेनिस

टेनिस

भारोत्तोलन

कुस्ती

एकूण

४७

७०

११७

 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.