Ind vs SL, 1st T20 : सूर्यकुमार यादव टी-२० संघाच्या नेतृत्वासाठी सज्ज

Ind vs SL, 1st T20 : ‘भारतीय संघाची ट्रेन मागील स्थानकावरून पुढे जाणार आहे,’ असं सूर्यकुमारने म्हटलं आहे 

173
Ind vs SL, 1st T20 : पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी रायन टेन ड्युसकाटे भारतीय ताफ्यात सामील
Ind vs SL, 1st T20 : पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी रायन टेन ड्युसकाटे भारतीय ताफ्यात सामील
  • ऋजुता लुकतुके

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी-२० संघाचं नेतृत्व यापूर्वी केलंय. भारतीय संघाला एक मालिका जिंकून दिलीय. तर दक्षिण आफ्रिकेत यजमानांविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधलीय. पण, यावेळी श्रीलंकेविरुद्ध तो नेतृत्व करेल तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी असेल. एकतर त्याच्याकडे दीर्घकालीन टी-२० कर्णधार म्हणून पाहिलं जातंय. यावेळी रोहित शर्माची (Rohit Sharma) जागा त्याला घ्यायचीय. पण, या गोष्टीचं सूर्यकुमारला फारसं दडपण आलेलं नाही. (Ind vs SL, 1st T20)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : भारतीय संघासाठी महत्त्वाची ऑलिम्पिक आकडेवारी)

‘गाडी मागील स्थानकावरून पुढे जाणार आहे,’ इतकंच तो यावर बोलताना म्हणतो. पण, भारतीय संघाने निवडलेला मार्ग विजयाचा आहे, हे त्याला निश्चित माहीत आहे. कप्तानपदासाठी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) असलेली चुरस मोडून काढून ३३ वर्षीय सूर्यकुमार भारतीय संघाचा कर्णधार बनला आहे. त्यानंतर पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तो सकारात्मक होता. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओतही तो हसऱ्या चेहऱ्याने प्रश्नांना सामोरं गेला. (Ind vs SL, 1st T20)

Insert tweet – https://twitter.com/BCCI/status/1816677320905679179

‘क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलणार नाहीए. मला कप्तानीमुळे वेगळी जबाबदारी नक्की मिळाली आहे. नवीन आव्हानाला सामोरं जायला मी तयार आहे,’ असं सूर्यकुमारने बोलून दाखवलं आहे. भारतीय संघ या मालिकेत विश्वविजेता संघ म्हणून उतरेल. कारण, अलीकडेच भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टी-२० विजेतेपद पटकावलं आहे. आता त्याच स्थानकातून ट्रेन पुढे न्यायची आहे, असं सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) म्हटलं आहे. (Ind vs SL, 1st T20)

(हेही वाचा- Jammu and Kashmirच्या कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला, ३ जवान जखमी)

‘रोहितकडून मी बरंच काही शिकलो आहे. त्याचीच कप्तानीची पद्धत मी पुढे सुरू ठेवणार आहे. तो मैदानावर आणि मैदानाबाहेरही खेळाडूंचा कर्णधार होता. तुम्ही कधीही त्याच्याकडे मदतीसाठी जाऊ शकत होता. त्याने खेळाडूंना आत्मविश्वास दिला. मी तेच करायचा प्रयत्न करणार आहे,’ असं शेवटी सुर्यकुमार म्हणाला. (Ind vs SL, 1st T20)

भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा पहिला टी-२० सामना २७ जुलैला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पल्लिकल इथं होणार आहे.  (Ind vs SL, 1st T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.