Ashadhi Ekadashi 2024 : वारीतून एसटीला फायदा किती? वाचा सविस्तर…

159
Ashadhi Ekadashi 2024 : वारीतून एसटीला फायदा किती? वाचा सविस्तर...
Ashadhi Ekadashi 2024 : वारीतून एसटीला फायदा किती? वाचा सविस्तर...

यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी (Ashadhi Ekadashi 2024) लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

(हेही वाचा –Jammu and Kashmirच्या कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला, ३ जवान जखमी)

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. (Ashadhi Ekadashi 2024)

(हेही वाचा –Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या)

प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल असा विश्वास एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे. (Ashadhi Ekadashi 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.