- ऋजुता लुकतुके
भारतीय संघासाठी पदकाचं सगळ्यात मोठं आशास्थान आहे तो भालाफेकपटू नीरज चोप्रा. टोकयो ऑलिम्पिकच्या अगदी शेवटच्या दिवशी त्याने सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतरही डायमंड्स लीगसह विश्व विजेतपदाच्या स्पर्धेतही त्याने सुवर्ण जिंकलं आहे. आताही पॅरिसमध्ये तो ९० मीटरच्या भालाफेकीचं उद्दिष्टं ठेवून आहे. त्याचवेळी पायाच्या स्नायूच्या दुखापतीनेही त्याला सतावलंय. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- Jammu and Kashmirच्या कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला, ३ जवान जखमी)
आता नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. यात तो वजनांच्या मदतीने वर्कआऊट करताना दिसतो. खेल इंडिया वेबसाईटने नीरजचा ताजा व्हीडिओ शेअर केला आहे.
Champion @Neeraj_chopra1 is training very hard for the #Paris2024 in Turkiye 💥 pic.twitter.com/hEE4lQzNfa
— The Khel India (@TheKhelIndia) July 25, 2024
नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकनंतर २०२३ ची डायमंड्स लीग तसंच आशियाई क्रीडास्पर्धेतही सुवर्ण जिंकलं आहे. त्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने एक रौप्य व एक सुवर्ण जिंकलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो सुवर्ण पदकाचाच दावेदार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मॅक्स देहनिंगने एकदा ९० मीटरच्या वर भालाफेक केली आहे. त्याच्याशिवाय इतर कुणालाही मागच्या ४ वर्षांत ही मजल मारता आलेली नाही. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘या’ खेळाडूंकडून भारताला आहे पदकांची आशा)
पॅरिसमध्ये ६ ऑगस्टला भालाफेरीची प्राथमिक फेरी पार पडेल. नीरजने हा अडथळा पार केला तर अंतिम फेरी ८ ऑगस्टला होईल. नीरजबरोबरच किशोर जाना हा आणखी एक भालाफेकपटू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. (Neeraj Chopra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community