Love Jihad: उरणमध्ये हिंदू तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

2737
Love Jihad: उरणमध्ये हिंदू तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी फरार
Love Jihad: उरणमध्ये हिंदू तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

नवी मुंबईतील उरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण-पनवेल मार्गावर (Uran Panvel Highway) एका २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. यशश्री शिंदे (Yashshree Shinde murder) असं मृत तरुणीचं नाव असून तिच्या छातीवर आणि अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Love Jihad)

यशश्री शिंदे ही मृत तरुणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. महामार्गावरुण संबंधित तरुणीचा मृतदेह हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी उरण येथील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. 

(हेही वाचा – संतांवर जातीयवादी टीका करणार्‍या Shyam Manav यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा; हिंदु जनजागृती समितीची मागणी)

शनिवारी (२७ जुलै) सकाळच्या सुमारास उरण-पनवेल (Uran Panvel Highway) मार्गावरील रस्त्यालगत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. प्रेमसंबंधातून तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. हत्या करणाऱ्या आरोपीने यशश्रीच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी हा मुसलमान धर्माचा असल्याचा आरोप यशश्रीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही देखील त्यांनी केली आहे. (Love Jihad)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.