Banganga Lake : ‘बाणगंगा’च्या उर्वरीत कामांसाठी नव्या कंत्राटदाराचा शोध सुरु…

642
Banganga Lake : ‘बाणगंगा’च्या उर्वरीत कामांसाठी नव्या कंत्राटदाराचा शोध सुरु…

बाणगंगा परिसर आणि याठिकाणची मंदिरे यांच्याशी संबंधित कामांमध्ये योग्य प्रकारची काळजी न घेतल्या प्रकरणी या कामासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. याठिकाणी झालेल्या कामाचा एकही पैसा कंपनीला देण्यात आलेला नसून कंत्राटच रद्द झाल्याने यापूर्वीच्या कामाची पैसेही देण्यात येणार नाही. त्यामुळे उर्वरीत कामासाठी आता महापालिकेच्यावतीने कंत्राट कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (Banganga Lake)

ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आतमध्ये एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) उतरवून तलावांच्या पायऱयांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (FIR) २५ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे महानगरपालिकेच्या वतीने त्याचदिवशी त्वरित पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढच्या काळात उर्वरित कामेही पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. तलावाच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (Banganga Lake)

(हेही वाचा – Banganga Lake Damage : कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या सूचना)

यासाठी महापालिकेने घेतला कंत्राट रद्द करण्याचा निर्णय

बाणगंगा तलाव परिसरात संयंत्र उतरवून पायऱ्यांना हानी पोहचवतानाच पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा भंग करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना गगराणी यांनी दिल्या. त्यासोबतच पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तलावातील गाळ काढण्याचे काम हस्तचलित यंत्रणेद्वारे (मॅन्युअल पद्धतीने) करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Banganga Lake)

त्यानुसार, महापालिकेने बाणगंगा तलावाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे यांचे कंत्राट रद्द करण्यात आले नव्याने कंत्राटदाराची निवड करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु केली जात आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या कामाचा एकही पैसा कंत्राट कंपनीला देण्यात आलेला नसून जेवढे काम या कंपनीने केले आहे, त्यानंतर राहिलेले उर्वरीत काम नव्याने नियुक्त केल्या जाणाऱ्या कंपनीकडून करून घेतले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्यावतीने मुंबईसह देशभरात अनेक कामे सुरु असून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया राबवली असती तर इतर कामांवर त्यांचा परिणाम झाला असता. त्यामुळे या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे बोलले जात आहे. (Banganga Lake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.