First Time in 147 Years : झिंबाब्वेच्या खेळाडूने क्रिकेटमधील एक नकोसा विक्रम नोंदवला

First Time in 147 Years : एका डावांत क्लाइव्ह मदंडेनं तब्बल ४२ धावा बाय म्हणून दिल्या.

5725
First Time in 147 Years : झिंबाब्वेच्या खेळाडूने क्रिकेटमधील एक नकोसा विक्रम नोंदवला
  • ऋजुता लुकतुके

झिंबाब्वेचा यष्टीरक्षक क्लाइव्ह मदंडेच्या नावावर क्रिकेटमधील एक नकोसा वाटणार विक्रम लागला आहे. अडवण्यासारखा चेंडू हातातून सुटला आणि त्या दरम्यान फलंदाजांनी धाव घेतली, तर त्याची नोंद बाय म्हणून होते. फलंदाजाने हा फटका खेळलेला नसतो. चेंडू बॅटला लागलेला नसतो. पण, चेंडू हातातून निसटल्यामुळे त्यांना धावायची संधी मिळते. (First Time in 147 Years)

तर क्लाईव्हने अशा ४२ धावा एका दिवसांत प्रतिस्पर्धी आयर्लंडच्या संघाला बहाल केल्या आहेत. २४ वर्षीय क्लाईव्हची ही पदार्पणाची कसोटी होती. झिंबाब्वेची फलंदाजी सुरू असताना तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याने ४२ धावा बहाल केल्यामुळे ही कसोटी त्याच्यासाठी विसरण्यासारखीच गेली आहे. (First Time in 147 Years)

(हेही वाचा – अलमट्टीतील पाण्याच्या विसर्गाबाबत CM Eknath Shinde यांंनी दिले ‘हे’ निर्देश)

या कसोटीत पहिल्या डावात झिंबाब्वेनं २१० धावा केल्यानंतर आयर्लंडने २५० धावा करत ४० धावांची आघाडी मिळवली आहे. अर्थात, बाय धावा क्लाईव्हच्या नावावर लागल्या असल्या तरी चूक त्याची एकट्याची नव्हती. झिबाब्वे संघातील लेगस्पिनरनी चेंडूची दिशा डाव्या यष्टीवर ठेवली होती. चेंडू सारखे लेगसाईडला जाऊन क्लाईव्हची अडचण होत होती. (First Time in 147 Years)

क्लाईव्ह मदंडेनं इंग्लंडच्या लेस एमेस यांचा विक्रम मोडला. एमेस यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत ३७ बाय धावांची खैरात वाटली होती. पण, लेस हे इंग्लंडच्या सर्वकालीन सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक मानले जातात. त्यामुळे पदार्पणातच हा धक्का बसला असला तरी क्लाईव्ह लेस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुनरागमन करू शकतो. झिंबाब्वे आणि आयर्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील ही पहिली कसोटी आहे. (First Time in 147 Years)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.