शीव रेल्वे मार्गावरील उड्डाणपुल (आरओबी) हा येत्या ३१ जुलै २०२४ च्या मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईने केलेल्या पाहणीनंतर हे रेल्वे उडाणपूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार, नवीन पुलाची बांधणी केली जाणार असून त्या करता विद्यमान पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे १ ऑगस्ट २०२४ पासून हे पूल आता वाहतुकीसाठी बंद राहणार राहणार आहे. (Sion ROB)
(हेही वाचा – Banganga Lake : ‘बाणगंगा’च्या उर्वरीत कामांसाठी नव्या कंत्राटदाराचा शोध सुरु…)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आरओबी हटवण्याची आणि स्टील गर्डर्स आणि आरसीसी स्लॅबसह नवीन आरओबी पुन्हा बांधण्याची शिफारस केली होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रस्तावित रेल्वे मार्गात शीवचे आरओबी येत होते. त्यामुळे मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने १०-११ किमी अंतरावरील शीव रेल्वे स्थानकाजवळ सध्याच्या आरओबीच्या जागी नवीन आरओबी बांधणार आहे. पुनर्बांधणीच्या कामादरम्यान जनतेला विद्यमान शीव आरओबीच्या दोन्ही बाजूला असलेले पर्यायी सार्वजनिक पादचारी पूलाचा (एफओबी) वापर करता येईल. रस्त्याच्या वापर करणाऱ्या वाहन चालकांनी वाहतूक विभागाने जारी केलेल्या वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. तसेच महत्त्वाचे काम पार पाडण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे आणि होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगीरी व्यक्त केली आहे. (Sion ROB)
पादचाऱ्यांना पर्यायी पादचारी पुलांचा वापर करता येईल
- सार्वजनिक पादचारी पूल (धारावी धोबीघाट एफओबी) शीव रुग्णालयाच्या (दक्षिण) दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर.
- शीव स्टेशनच्या कुर्ला (उत्तर) टोकाला सार्वजनिक पादचारी पूल सुमारे ३५० मीटर अंतरावर. (Sion ROB)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community