Apple Price Cut : आयफोनच्या सर्व मॉडेलच्या किमतीत घट

Apple Price Cut : आयात शुल्क कमी झाल्यामुळे ॲपल कंपनीने आपल्या सर्व आयफोन मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत. 

209
Apple Price Cut : आयफोनच्या सर्व मॉडेलच्या किमतीत घट
  • ऋजुता लुकतुके

आयफोनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ॲपल कंपनीने आयफोनच्या सर्व मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल फोनवरील आयात शुल्क २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणलं होतं. त्याचा फायदा ॲपल कंपनीने ग्राहकांना देऊ केला आहे. भारतीय बाजारपेठेत मोबाईलच्या किमती कमी करणारी ॲपल ही पहिली कंपनी ठरली आहे. (Apple Price Cut)

ॲपल कंपनीच्या नवीन फोनची घोषणा सप्टेंबर २०२४ मध्ये अपेक्षित आहे. त्यापूर्वी कंपनीने ही दरकपात केली आहे. ॲपल ऑनलाईन दुकानांमध्ये नवीन किंमत पहायला मिळते. (Apple Price Cut)

(हेही वाचा – BEST : बेस्ट उपक्रमाची सुरक्षा अनामतच्या नावाखाली लूट, वीज ग्राहकांना पाठवल्या नोटिसा)

आयफोन १५ प्रो व आयफोन १५ मॅक्स प्रो हे दोन फोन १,३४,९०० रुपये तसंच १,५९,९०० किंमतींना अनुक्रमे लाँच झाले होते. आता त्यांची किंमत अनुक्रमे १,२९,९०० व १,५४,००० रुपये अशी झाली आहे. म्हणजेच मॅक्स प्रो फोनचा दर ५,९०० रुपयांनी तर प्रो फोन ५,१०० रुपयांनी कमी झाला आहे. व्हॅनिला आयफोन १५ आणि व्हॅनिला आयफोन प्लसच्या किमती फक्त ३०० रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. आता हे दोन फोन अनुक्रमे ७९,६०० आणि ८९,६०० रुपयांना मिळतील. (Apple Price Cut)

आयफोनच्या आधीच्या मॉडेलच्या किमती फारशा कमी झालेल्या नाहीत. आयफोन १३ सीरिजमध्ये ३०० रुपयांची कपात झाली आहे. तर परवडणारा आयफोन एसईच्या किमती २,३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. आयफोन १३ आणि १४ आता अनुक्रमे ५९,६०० आणि ६९,६०० रुपयांना मिळत आहेत. (Apple Price Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.