मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रेल्वे स्थानक परिसरासह इतर ठिकाणी फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु असल्याने दादर रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा मोकळा पाहून नागरिकांकडून महापलिकेचे धन्यवाद मानले जात आहे. मात्र, दिवसा ही कारवाई कडक असली तरी प्रत्यक्षात रात्री आठ वाजल्यानंतर फेरीवाल्यांकडून रेल्वे स्थानक परिसराला विळखा घातला जात आहे. त्यामुळे आता दादर रेल्वे स्थानकालगत आणि आसपासच्या परिसरात मध्यरात्रीपर्यंत फेरीवाले व्यवसाय करताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची नक्की कारवाई कुठली आणि कुणासाठी असा सवाल केला जात आहे. (Hawkers)
मुंबई महापालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबईत रेल्वे स्थानक परिसरातील खाद्य पदार्थ विक्रेते तसेच फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढा दादर रेल्वे स्थानकाचा परिसरात प्रवाशांसह नागरिकांना मोकळेपणाने चालता येत आहे. मात्र, दिवसा कारवाई तीव्र असल्याने आता रात्री आठ नंतरच फेरीवाल्यांकडून धंदे थाटले जात आहेत. विशेषत: सुविधा समोरील कवी केशवसुत उड्डाणपुलाखालील तीन गाळ्यांमध्ये तर फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात आणि त्या फेरीवाल्यांचा अडथळा पार करून रेल्वे स्टेशन रात्रीच्या वेळी गाठणेही प्रवाशांसह नागरिकांना कठिण होऊन बसते. (Hawkers)
(हेही वाचा – Malad : रस्त्यांवरील अवैध कार पार्किंग, खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाल्यांमुळे मालाडकर त्रस्त)
महापालिकेच्या विरोधात तीव्र नाराजी
सुविधा समोरील उड्डाणपुलाच्या जागेत चक्क बटाटे वडे तिथेच तळून विकले जातात. रात्री आठ नंतर वडापाव विक्रेत्यांचे स्टॉल पुलाच्या गाळ्यांमध्ये लागले जातात. तसेच भाजी विक्रेत्यांकडून रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांसह गाळ्यांच्या जागा अडवल्या जातात. ज्यातून प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडता येत नाही आणि स्थानकांतही जाता येत नाही. त्यामुळे दिवसा होणाऱ्या चांगल्या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी फेरीवाल्यांकडून रेल्वे स्थानक परिसर अडवून व्यवसाय केला जात असल्याने महापालिकेच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना पहायला मिळत आहे. (Hawkers)
दिवसा रेल्वे स्थानक परिसरातील या कारवाईमुळे स्थानिकांसह प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात असले तरी प्रत्यक्षात ही कारवाई केवळ रानडे मार्गावर सुविधापासून ते पुढे सिग्नलपर्यंत पहायला मिळते. परंतु डिसिल्व्हा रोड आणि जावळे मार्गावर फेरीवाले बिनधास्त व्यवसाय करताना दिसता. शनिवारी सुट्टीच्या दिवशी तर या रानडे मार्ग वगळता दोन्ही मार्गावरील फेरीवाल्यांचा व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याने महापालिकेने या दोन्ही रस्त्यावरील फेरीवाल्यांना लायसन्स दिले का असा सवाल उपस्थित होऊ लागले आहे. (Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community