Pune News : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना

104
Pune News : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना
Pune News : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना

सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका (Pune News) क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम पुण्याला रवाना करण्यात आली.

(हेही वाचा –Delhi Coaching Incident: दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये IAS ची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू; नेमकं कारण काय?)

पुणे येथील बाधिठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात ०२ उपअभियंता (यांत्रिकी), २ सुपरवायझर, ३ तांत्रिक कर्मचारी, ४ जेटींग वाहने ४ वाहनचालक, 8 ऑपरेटर/मदतनीस, १७७ सफाई कामगार, ०४ उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, ०७ वाहनचालक आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर ८० खराटे झाडू, ८० ब्रश, ८० फावडे, ८० काटे/पंजे आदी साहित्याचा समावेश आहे. (Pune News)

अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषधसाठा, ORS पॅकेट, पाणी व बिस्कीट आदींचा समावेश आहे. तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता सोनावणे, १ परिचारक व १ वाहनचालकाचा समावेश आहे. (Pune News)

(हेही वाचा –Delhi Coaching Incident: दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये IAS ची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू; नेमकं कारण काय?)

अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात ५ धुर फवारणी मशीन, दोन युटीलिटी वाहने ०१ इनोव्हा वाहन व औषधसाठ्यासह १० फवारणी पंपाचा समावेश आहे. या पथकासोबत २ स्वच्छता निरीक्षक, ०४ वाहनचालक, 19 फायलेरिया असे एकूण २५७ अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले आहेत. उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे पथक रवाना करण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त तुषार पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी आदी उपस्थित होते. (Pune News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.