राष्ट्रनिष्ठ लेखनाद्वारे पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेष योगदान देणारे हिंदुस्थान पोस्टचे (Hindusthan Post) संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांचा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण करून देणारी मराठा तलवार देऊन हा सन्मान करण्यात आला. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते ही तलवार प्रदान करण्यात आली.
(हेही वाचा – PM Narendra Modi : १५ ऑगस्टच्या भाषणासाठी सूचना पाठवा, पंतप्रधान मोदींचं ‘मन की बात’मधुन आवाहन)
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा सन्मान २८ जुलै रोजी करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब, ज्येष्ठ नाणीसंकलक अशोकसिंह ठाकूर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, बडोदा संस्थानचे वंशज डॉ. हेमंत राजे गायकवाड, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असीलता राजे, तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
View this post on Instagram
विशेष सन्मान आणि प्रकाशन
याच कार्यक्रमात स्वप्नील सावरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आप्पा परब यांना ‘शिवसन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात आप्पा परब यांच्या ‘शिवराजाभिषेक’ या पुस्तकाचे, डॉ. हेमंत राजे गायकवाड यांच्या ‘द ग्रेट शिवाजी फादर ऑफ नेव्ही’ या पुस्तकाचे, तर श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या ‘इतिहासमंथन’ या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (Award Ceremony)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community