Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; पर्यटनास बंदी

157
Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; पर्यटनास बंदी
Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; पर्यटनास बंदी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीची (Shivneri Fort) तटबंदी असलेला कडा कोसळला आहे. त्यामुळे किल्ले शिवनेरीवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केले आहे. सुदैवाने सायंकाळची वेळ असल्याने गडावर पर्यटकांची रेलचेल नव्हती. मात्र, घटनास्थळापासून दोघे जण पुढे गेले आणि त्यांच्या मागील बाजूला दरड कोसळल्याने त्यांचे जीव सुदैवाने बचावला. महादरवाजा ते परवानगी दरवाजाच्या दरम्यान ही घटना घडली.

भिंतही तुटून कठड्याला भगदाड
पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी किल्ले, डोंगरदऱ्या, धबधबे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. बंदी असताना देखील पर्यटक अशा धोकादायक ठिकाणी जातात. यातून अनेकदा त्यांना आपले प्राणास देखील मुकावे लागते. किल्ल्यावर ३१ जुलै पर्यंत बंदी असताना देखील हौशी पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. काही दगडांच्या माऱ्याने पदपथमार्गावर पुरातत्त्व खात्याकडून बांधण्यात आलेली भक्कम अशी दगडी संरक्षक भिंतही तुटून कठड्याला भगदाड पडले आहे. आता सुरक्षेसाठी तेथे तात्पुरती फांदी लावण्यात आली आहे. (Shivneri Fort)

‘लेण्याद्री आणि शिवनेरी ही दोन्ही डोंगरी पर्यटनस्थळे आहेत. महिनाभरापूर्वी लेण्याद्री येथे माकडांच्या हालचालीमुळे दगड पायरीमार्गावर कोसळले होते. त्याचवेळी आम्ही भारतीय भूगर्भशास्त्र विभागाला धोकादायक कड्यांच्या सर्वेक्षणाबाबत पत्र पाठविले आहे. आता शिवनेरीच्या सर्वेक्षणासाठीही कळवत आहोत. सुरक्षेसाठी करायच्या उपाययोजना, त्याबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला कळवून कार्यवाही केली जाईल,’ असे जुन्नर येथील सर्वेक्षक सहायक भारतीय पुरातत्त्व विभागाचे बाबासाहेब जंगले यांनी सांगितले. (Shivneri Fort)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.