अमरावती (28 जुलै) परतवाडा रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ शनिवारी रात्री सुमारे 60 लाख रुपये किंमतीचे 900 ग्रॅम सोने लुटल्याच्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. परतवाडा येथील सराफा व्यावसायिक आणि मोती ज्वेलर्सचे संचालकांसोबत हा प्रकार घडला आहे. या घटनेने संचालक विक्की सुनील अनासणे यांना एवढा जबर धक्का बसला की त्यांना काहिच माहिती देता आली नाही. वृत्त लिहेपर्यंत एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. (Crime)
(हेही वाचा- Shivneri Fort: शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला; पर्यटनास बंदी)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोती ज्वेलर्सचे संचालक विक्की सुनील अनासाने हे त्यांच्या कामानिमित्त नियमितपणे कारने अचलपूरला येत-जात होते. शनिवारी सुद्धा काही व्यवहारा निमित्त अचलपूरला गेले. यादरम्यान कारमध्ये काही बिघाड झाल्याने त्यांनी परतवाडा-अमरावती रोडवर असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ कार थांबवली. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फोनवरून मेकॅनिकसोबत बोलणे केले असता काही बोल्ट टाईट करून वायर जोडण्यास सांगितले. त्यानंतर गाडीत बसून कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना सोन्याची बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. हे पाहून विक्की अनासानेचे भान हरपले आणि त्यांना धक्का बसला. त्यांनी कशीबशी 900 ग्रॅम सोन्याची चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे एसएचओ संदीप चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, अतिरिक्त एसपी कुमावतही घटनास्थळी पोहोचले व पुढील तपास सुरू केला. (Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community