नवी मुंबई हिट अॅण्ड रन (Hit And Run Case) प्रकरणी आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी याला अटक केली आहे. वाशीमध्ये (Vashi Accident Case) एका भरधाव इनोव्हा गाडीनं रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी जो चालक गाडी चालवत होता, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) नव्हतं. दरम्यान, दोघांच्या मेडिकल टेस्ट केल्या असून यामध्ये दोघांनीही मद्यपान केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय घडलं?
सुभाष शुक्ला हा गाडी चालवत होता. तर भगवत तिवारी हा त्याच्या बाजूला बसला होता. ड्रायव्हर असलेल्या भगवत तिवारी यानं त्याचा नातेवाईक सुभाष शुक्ला याला गाडी चालवायला दिली होती. या सुभाष शुक्लाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याची माहिती समोर आली आहे. (Hit And Run Case)
या अपघातात ऑटो चालक मुन्नालाल गुप्ता याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. अपघातानंतर इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Hit And Run Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community