Lakshadweep Culture : चला जाणून घेऊया, लक्षद्वीप बेटाचा शोध कोणी लावला आणि कशी निर्माण झाली इथे लोकवस्ती?

109
Lakshadweep Culture : चला जाणून घेऊया, लक्षद्वीप बेटाचा शोध कोणी लावला आणि कशी निर्माण झाली इथे लोकवस्ती?
Lakshadweep Culture : चला जाणून घेऊया, लक्षद्वीप बेटाचा शोध कोणी लावला आणि कशी निर्माण झाली इथे लोकवस्ती?
◆लक्षद्वीप बेटांचा इतिहास

लक्षद्वीप बेटांवर असलेल्या स्थानिक लोकांच्या दंतकथेप्रमाणे असं सांगितलं जातं की, केरळ इथला शेवटचा राजा चेरमान पेरूमल याच्या कारकीर्दीमध्ये या बेटांवर वसाहतीची सुरुवात झाली असावी. (Lakshadweep Culture)

(हेही वाचा- Delhi Coaching Incident: कोचिंग सेंटरमधील दुर्घटनेनंतर विद्यार्थी संतप्त; विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात रोष)

असं म्हटलं जातं की, काही अरबी व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून राजाला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडलं गेलं. त्यानंतर काही काळाने राजाने मक्केला जाण्याच्या बहाण्याने तिथून पलायन केलं. या राजाला शोधण्यासाठी मक्क्याला जाण्याच्या वाटेवर अनेक खलाशी बोटींना समुद्रात पाठवण्यात आलं. त्या बोटींपैकी कननोरच्या राजाची बोट एका मोठ्या वादळात सापडून फुटली. तेव्हा राजाने आणि त्याच्यासोबत आलेल्या बोटीवरच्या लोकांनी अरबी समुद्रातच काही दिवस घालवले. त्यानंतर शेवटी ते सगळेजण एका बेटावर येऊन पोहोचले. त्या बेटाचं नाव बंगारम बेट असं होतं. त्यानंतर ते लोक जवळच असलेल्या अगत्ती नावाच्या बेटावर गेले. थोडं वातावरण निवळल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या बेटांवर प्रवास करून तिथे वास्तव्य केलं. अशाप्रकारे ते फिरत फिरत मुख्य भूमीवर परत आले. (Lakshadweep Culture)

त्यानंतर परत एकदा पळून गेलेल्या राजाला शोधण्यासाठी सैनिकांची आणखी एक तुकडी अरबी समुद्रात पाठवण्यात आली. त्यावेळी या तुकडीने अमिनी नावाच्या बेटाचा शोध लावला आणि ते सर्वजण तिथे राहायला लागले. हीच तिथली पहिली वसाहत असावी असा अंदाज बांधला जातो. या दुसऱ्या तुकडीमध्ये हिंदू धर्मीय लोकही सामील होते. म्हणून आजही या बेटांवर इस्लामचं वर्चस्व दिसत असलं तरी हिंदूंच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, चाली-रीती इथे पाहायला मिळतात. (Lakshadweep Culture)

(हेही वाचा- शिळफाटा सामूहिक अत्याचार, हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी – CM Eknath Shinde)

त्यानंतर पुढे या लोकांनी अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ आणि काल्पेनी या बेटांवर आधी लहान लहान वसाहती स्थापन केल्या. मग पुढे या बेटांवरच्या लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केलं. (Lakshadweep Culture)

भारतात सोळाव्या शतकात पोर्तुगीज आल्यानंतर समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने लक्षद्वीपला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती. त्यासाठी बेटांवरच्या जहाजांची लूट करायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक बहुतेक वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरायचे. पण बेटावर राहणाऱ्या लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या पोर्तुगीजांना विष घालून ठार मारलं. अशाप्रकारे पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट झाला. (Lakshadweep Culture)

(हेही वाचा- नवी मुंबईत Hit And Run Case प्रकरणी दोघांना अटक!)

◆लक्षद्वीप बेटावरचं वातावरण आणि पर्यावरण संस्कृती

लक्षद्वीप बेटांवरचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६० सेंमी इतकं आहे. या बेटांवर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कडक उन्हाळा असतो. (Lakshadweep Culture)

तसंच या बेटांवर नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस आणि रानटी बदाम ह्या वनस्पती आढळतात. पुळणींच्या जवळ थॅसिआ हेंप्रिचीन आणि साइमॉड्सीए आयसोएटिफोलिया अशा दोन वेगळ्या प्रकारांचं सागर गवत आढळतं. लक्षद्वीप बेटांमध्ये सागरी प्राणिजीवन अतिशय समृद्ध आहे. तसंच भूभागावर गुरंढोरं आणि पाळीव खाद्यपक्षीही इथे आढळतात. सामान्यपणे इथे आढळणारे थराथसी म्हणजेच स्टर्ना फुस्काटा आणि कारिफेटू म्हणजेच ॲन्वहस स्टॉलिड्स नावांचे समुद्रपक्षी आहेत. हे बेट पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. इथे दरवर्षी लाखो लोक फिरायला येतात. (Lakshadweep Culture)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.