Paris Olympic 2024 : टोकियोमध्ये बिघडलेल्या पिस्तुलाने केला होता घात, त्या धक्क्यातून मनू कशी सावरली?

मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकून भारतासाठी पदकाचं खातं उघडलं आहे.

214
Paris Olympic 2024 : १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात मनू आणि सरबजित कांस्य पदकाच्या शर्यतीत, रमिताचं आव्हान संपुष्टात
  • ऋजुता लुकतुके

२२ वर्षीय मनू भाकरनं (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारतासाठी पदकांचं खातं उघडलं आहे. इतकंच नाही तर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली आहे. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकरने अंतिम फेरीत २२१.७ गुण कमवत कांस्य पदक नावावर केलं आहे. अंतिम फेरीत मनू भाकर (Manu Bhaker) आणि ओह ये जिन, किम ये जी या दोन कोरियन स्पर्धकांमध्ये कमालीची चुरस होती. अगदी कांस्य ठरवणाऱ्या शेवटच्या फैरीतही मनूने १०.४ गुण कमावले तर कोरियाच्या किम ये जीने १०.६ आधीच्या फैरीत ती फक्त ०.१ गुणांनी मागे होती. त्यामुळे या फैरीनंतर ती ०.१ गुणांनी पुढे गेली. आणि मनूला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

(हेही वाचा – Love Jihad : लग्नाचे आमिष दाखवून धर्मांध मोहम्मद खानने हिंदू तरुणीला तीन वेळा केले गर्भवती, नंतर झाला फरार)

भारताच्या नावावर पहिलं कांस्य लागलं. २०१२ मध्ये गगन नारंगने १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचं शेवटचं नेमबाजीतील पदक जिंकलं होतं. आता मनू २५ मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि संघिक अशा दोन स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे कदाचित मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी खेळाडूही ठरू शकते.

२२ वर्षीय मनू ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. पण, तिच्यासाठी हे पहिलेपणही नवीन नाहीए. कारण, १६ व्या वर्षी तिने गंभीरपणे नेमबाजीकडे पाहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक पदकासह ती हे पहिलेपण जपत आली आहे. २०१८ मध्ये युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तिने देशासाठी पहिल्यांदा सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर नेमबाजी विश्वचषकात सुवर्ण जिंकणारी ती वयाने सगळ्यात लहान नेमबाज होती. तर २०२३ मध्ये आशियाई क्रीडास्पर्धा तिने जिंकली तेव्हाही ती फक्त २१ वर्षांची होती. मागच्या ६ वर्षांत ११ विश्वचषक पदकं तिने आपल्या नावावर केली आहेत. यातील ९ सुवर्ण आहेत. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत DCM Devendra Fadnavis यांना स्थान; पहिल्या रांगेत बसवले)

मनू भाकर (Manu Bhaker) १४ व्या वर्षीपर्यंत नेमबाजी सोडून इतर सगळे खेळ, अगदी मणिपुरी मार्शल आर्ट्स आणि मुष्टियुद्धही खेळत होती. पण, तिच्या वडिलांनी दीड लाखांची पिस्तुल घरी खरेदी केली होती. ती एकदा मनूच्या हातात पडली आणि तिची या खेळाशी पहिली ओळख झाली. वडिलांनी मग तिला पिस्तुल शिकवण्यात उत्साह दाखवला. आणि सुरू झाला मनू भाकरचा (Manu Bhaker) आंतरराष्ट्रीय प्रवास.

२०१८ पासून तिची व्यावसायिक कारकीर्दही सुरू झाली. आणि २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकमध्येही ती विजयाची प्रमुख दावेदार होती. अंतिम फेरीत पहिल्या पाच फेऱ्यांनंतर ती आघाडीवर होती. पण, अचानक तिची पिस्तुल बिघडली. ती जाम झाली आणि गोळी पिस्तुलातून सुटेना. मनू रडवेली झाली होती. आणि आयोजकांना पिस्तुल बदलण्याची विनंती करत होती. पण, तिची ही मागणी अमान्य करण्यात आली. पिस्तुलाचा फक्त बिघडलेला भाग बदलण्याची परवानगी तिला मिळाली. पण, त्याने प्रश्न मिटला नाही. मनूची बाजू मांडण्यासाठी प्रशिक्षक रौनक पंडित यांनाही आयोजकांनी बोलू दिलं नाही. आणि अखेर मनूला अंतिम फेरी अर्ध्यातच सोडावी लागली होती. शिवाय आधीचे प्रशिक्षक जसपाल राणा आणि तेव्हाचे प्रशिक्षक रौनक पंडित यांच्यातील वादाला नवीन तोंड फुटलं. आणि नेमबाजी पथकाची अवहेलना फक्त झाली.

(हेही वाचा – Award Ceremony : ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव)

पण, मनू अशा आव्हानांसाठी कणखर आहे. आणि तेव्हा १८ वर्षांची असलेली मनू आता २२ व्या वर्षी प्रगल्भही झाली आहे. हे अपयश मागे टाकून २०२४ ची तयारी करण्यासाठी तिला कुणी तयार करावं लागलं नाही. म्हणूनच आता कांस्य जिंकल्यावर मनू म्हणते, ‘टोकयो हा फक्त एक अनुभव होता. माझा गीतेवर विश्वास आहे. नेकी कर दर्यामें डाल, या तत्त्वानुसार मी फक्त माझं काम करत राहिले. आताही माझा दृष्टिकोण तोच होता. मी प्रक्रियेचं पालन केलं. जे रोज करते, तेच करत आले आणि पदक हे त्याचंच फळ आहे.’ (Paris Olympic 2024)

कांस्य पदकानंतर मनू जास्त शांत आणि धीरोदात्त वाटायला लागली आहे. तिच्या आणखी दोन स्पर्धा या ऑलिम्पिकमध्ये बाकी आहेत. आताही तिने तडफेनं रौप्य आणि सुवर्णासाठी प्रयत्न केला होता. तीच तडफ पुढचे दोन दिवस ती नक्कीच दाखवणार.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.