Shivneri किल्ल्यावरील दरड कोसळली, ३१ जुलैपर्यंत पर्यटनास बंदी

134
Shivneri किल्ल्यावरील दरड कोसळली, ३१ जुलैपर्यंत पर्यटनास बंदी
Shivneri किल्ल्यावरील दरड कोसळली, ३१ जुलैपर्यंत पर्यटनास बंदी

राज्यात सर्वदूर पाऊस सक्रीय झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. पुण्यात किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळल्याची घटना (Shivneri Fort Kada Collapsed) घडली आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा पाऊस झाला. सुदैवाने सायंकाळची वेळ असल्याने गडावर पर्यटकांची रेलचेल नव्हती. मात्र, घटनास्थळापासून दोघे जण पुढे गेले आणि त्यांच्या मागील बाजूला दरड कोसळल्याने त्यांचे जीव सुदैवाने बचावला. महादरवाजा ते परवानगी दरवाजाच्या दरम्यान ही घटना घडली. अचानक दरड कोसळल्याने किल्ले शिवनेरीवर फिरण्यासाठी आलेले पर्यटक काही वेळ गोंधळून गेले होते. किल्ल्यावर ३१ जुलै पर्यंत बंदी (Shivneri kilaa closed till 31st July) असताना देखील हौशी पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. (Shivneri)

(हेही वाचा – Om Certificate: शिवाजी महाराजांची नीती वापरा; श्रध्द्धेचे युद्ध श्रध्द्धेने लढू या: रणजीत सावरकर)

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी किल्ले, डोंगरदऱ्या, धबधबे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. बंदी असताना देखील पर्यटक अशा धोकादायक ठिकाणी जातात. यातून अनेकदा त्यांना आपले प्राण देखील गमवावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ (Birth place of Chhatrapati Shivaji Maharaj) असलेल्या किल्ले शिवनेरीची तटबंदी असलेला कडा कोसळला आहे. त्यामुळे किल्ले शिवनेरीवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (Shivneri)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.