आजच्या तरुण पिढीला गड-किल्ले आणि शिवराज्याभिषेकाचा अभ्यास करण्याचा सल्ला ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब (Appa Parab) म्हणजेच बाळकृष्ण सदाशिव परब यांनी रविवारी २८ जुलैला दिला. “शिवराजाअभिषेक’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या पुस्तकाचा अभ्यास करा. ही बिझनेस पॉलिसी नाही तर जवळपास ३,००० किल्ले आपली वाट पहात आहेत, शिवरायांचा राजाभिषेक कसा झाला, याची उत्सुकता लागून राहिली आहे, त्याचाही अभ्यास करावा,” असे मतही परब यांनी व्यक्त केले.
पुस्तक अभ्यासाला घ्या!
“राज्याभिषेक समितीने हे इतके मोठे विश्व उभारले त्याचे तुम्ही मावळे आहात. हे पुस्तक १९७५ साली ३००व्या राज्याभिषेकाच्यावेळी लिहिले होते, पण त्याकडे सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी पाठ फिरवली,” अशी खंत व्यक्त करत तरुणांनी आता अभ्यासाला घ्यावे, असे मत परब यांनी मांडले. परब यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांचे आभार मानले. (Award Ceremony)
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : टोकियोमध्ये बिघडलेल्या पिस्तुलाने केला होता घात, त्या धक्क्यातून मनू कशी सावरली?)
आप्पा परब यांची इतिहासातील ३५ पेक्षा जास्त पुस्तके
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ नाणीसंकलक अशोकसिंह ठाकूर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, बडोदा संस्थानचे वंशज डॉ. हेमंत राजे गायकवाड, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असीलता राजे, तसेच सुनील पवार हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या पदाधिकाऱ्यांनीही या वेळी आप्पा परब यांचा सत्कार केला. आप्पा परब (Appa Parab) यांनी इतिहासातील विविध विषयांवर ३५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यासाठी विविध सामाजिक आणि शासकीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. (Award Ceremony)
स्वप्नील सावरकर यांचा मराठा तलवार देऊन सन्मान
राष्ट्रनिष्ठ लेखनाद्वारे पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेष योगदान देणारे ‘हिंदुस्थान पोस्ट’चे (Hindusthan Post) संपादक स्वप्नील सावरकर यांचा श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण करून देणारी मराठा तलवार देऊन हा सन्मान करण्यात आला. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते ही तलवार प्रदान करण्यात आली. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने ‘जागर शिवराज्याभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Award Ceremony)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community