‘मुक्त झाला प्रतापगड, वाट पहातोय विशाळगड’, ‘शिंदे सरकार विशाळगडाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम लवकरच करा’ ‘आता चर्चा नको कृती हवी’, असे विविध फलक हातात धरून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी २८ जुलै या दिवशी मुंबईमध्ये मूकनिदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या (Hindu Janajagruti Samiti) नेतृत्त्वाखाली मुंबईतील दादर (पश्चिम) येथे हे मूकनिदर्शन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालेल्या कोल्हापूरमधील विशाळगडावर १५६ अतिक्रमणे होती. जिल्हा प्रशासनाने यांतील १०४ अतिक्रमणे हटवली असून सद्यस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सरकारने विशाळगडावरील ही अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी केली. या आंदोलनामध्ये ‘बा रायगड परिवार’ संघटनेचे आदित्य माने, ‘हिंदु महासभे’चे पांडुरंग पवार, ‘भटकंती कट्टा’ संघटनेचे नितीन जाधव, ‘सनातन संस्थे’च्या धनश्री केळशीकर, ‘हिंदु जनजागृती समिती’चे सतीश सोनार यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निदर्शनामध्ये युवक-युवती सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी थांबून निदर्शनाचा विषय समजून घेतला, तर येणार्या जाणार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. (Hindu Janajagruti Samiti)
(हेही वाचा Love Jihad : लग्नाचे आमिष दाखवून धर्मांध मोहम्मद खानने हिंदू तरुणीला तीन वेळा केले गर्भवती, नंतर झाला फरार)
गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण होणे लज्जास्पद
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गड-दुर्ग यांचे रक्षण व्हावे, यासाठी आम्ही निदर्शने करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे ज्या महाराष्ट्राचे रक्षण झाले, त्या राज्यात शिवरायांच्या गड-दुर्गांच्या रक्षणासाठी आंदोलन करावे लागणे हे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद आहे. हे अतिक्रमण सरकारने त्वरित हटवून विशाळगडासह अन्य सर्व गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Join Our WhatsApp Community