Heavy Rain : राजकारण्यांची संवेदनशीलता संपुष्टात येतेय का?

182
Heavy Rain : राजकारण्यांची संवेदनशीलता संपुष्टात येतेय का?
Heavy Rain : राजकारण्यांची संवेदनशीलता संपुष्टात येतेय का?
  • सुजित महामूलकर

मुंबईसह राज्यातील अनेक भागात विशेषतः पुण्यात पावसाने थैमान घातले. मुंबईच्या २६ जुलैप्रमाणे गुरुवारी ‘पुणे २५ जुलै’ची आठवण मनात घर करून गेली. एकीकडे वरुणराजाने हाहाकार माजवला असतानाही राजकारणी मात्र त्यावरही आपली ‘राजकीय पोळी’ भाजण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत होते. अशा आपत्कालीन परिस्थितीतही आजकाल राजकीय व्यक्ती असंवेदनशील भाषा आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानू लागले आहेत. त्यामुळे खरंच राजकारण्यांची संवेदनशीलता संपुष्टात येत आहे का?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला, तर आश्चर्य वाटू नये.

सत्ताधारी-विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप

राज्यात या मुसळधार पावसाने (Heavy Rain) ग्रामीण भागाला, तसेच पुण्याला अक्षरशः झोडपून काढले. यात ५ जणांचा बळी गेला, तर जवळपास सात-आठ जिल्ह्यांत शाळा-कॉलेजला एक दिवस आधीच सुट्टी जाहीर करण्यात आली. इतके होऊनही या परिस्थितीतही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात मशगुल होते. यातून राजकारण्यांना विशेषतः विरोधी पक्षांना एखादा राजकीय मुद्दाच हाती लागल्याचे समाधान मिळाले, असे वातावरण दिसत होते.

(हेही वाचा – Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नादात व्हॉटस्अपच्या ग्रुपमध्ये अॅड केले अन् ३४.६२ लाख रुपयांना फसवले)

राजकीय पक्षांनी विश्वासार्हता गमावली

“आजकाल देशभरातले सगळेच राजकीय पक्ष आपापला अजेंडा, मतदार आणि राजकीय गणिते यावर अधिक लक्ष देत आहेत. ते हे विसारतात की, ते ज्यांच्या मतांवर ते निवडून येतात त्यांच्याप्रती त्यांची काही जबाबदारी आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की, आपल्या जाहीरनाम्यात काही आकर्षक घोषणा करतात आणि निवडून आले की, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी घेत नाहीत. परिणामी लोकांचा या राजकीय पक्षांवरील विश्वास उडत चालला आहे. या नेत्यांच्या डोळ्यातील पाणी सुकले आहे, पण अशा पूर परिस्थितीत त्यांच्या डोळ्यातून ‘राजकीय पाणी’ वाहू लागते,” असा टोला जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी हाणला.

नद्यांमध्ये पायाभूत सुविधा, बांधकाम

सांगायचा मुद्दा इतकाच की, निसर्गाला रोखणे हे एका दिवसाचे काम नाही. एका न्यूज चॅनलला जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी पायाभूत सुविधा उभारताना निसर्गाचा ऱ्हास होत असल्याची खंत व्यक्त केली. पुण्यातील नद्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बांधकाम होत असून प्रवाह वळवला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आणि हा धोका वातावरणीय बदल लक्षात न घेता पत्करला जात आहे, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Asia Cup 2024 Final : भारतीय महिला क्रिकेट संघाचा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पराभव)

२६ जुलैची आठवण

गुरुवारी २५ जुलैला अर्ध्या महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. मुंबईत फार विशेष पाऊस झाला नसला, तरी २६ जुलैची आठवण त्या पावसाने नक्कीच करून दिली. विहार तलावही बुधवारी पहाटे भरून वाहू लागला होता. सुदैवाने गुरुवारी मुंबईत पावसाचा जोर कमी झाला अन्यथा २६ जुलै २००५ ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागला नसता. याचे कारण विहारचे पाणी वाहून मिठी नदीची (प्रत्यक्षात नाला) पाण्याची वाढू लागते आणि दुपारच्या वेळी समुद्राला भरती येते आणि पावसाचे पाणी जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात. २६ जुलै २००५ या दिवशी तेच झाले आणि त्या पावसाचा अनुभव ज्यांनी घेतला त्यांच्या मनात निश्चितच धडकी भरल्याशिवाय राहिले नसेल. (Heavy Rain)

२०१९ ला भाजपाला फटका

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगलीला अतिवृष्टी झाली आणि पूर आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या भागात जाणे टाळले आणि मुंबईत आढावा बैठक घतली. त्यानंतर त्याचा काही प्रमाणात फटका पक्षाला बसला. (Heavy Rain)

(हेही वाचा – Shivneri किल्ल्यावरील दरड कोसळली, ३१ जुलैपर्यंत पर्यटनास बंदी)

पुरोगामी महाराष्ट्रात अशोभनीय वक्तव्ये

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील नेत्यांनी आपत्कालीन परिस्थितीत ही अशोभनीय वक्तव्ये वापरली, तर मागास राज्यांनी आदर्श कुणाचा घ्यायचा. किमान राज्यातील जनता, मतदार अडचणीत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी सत्ताधारी पक्षावर राजकीय पदाचा वापर करून दबाव आणणे अपेक्षित आहे अन्यथा जनतेने ठरविल्यास त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते.

विरोधी पक्षांचे राजकारण

गुरुवारी राज्यभरात पावसाचे थैमान सुरू असताना शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर आरोप करण्याचा दैनंदिन कार्यक्रम रद्द केला नाही. राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि शिंदे सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली.

मात्र मागणी केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही. सरकारला या पूर आणि दुष्काळ या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण विषयावर बोलणे पसंत केले. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्हिडिओ क्लिपिंगवरून आरोप-प्रत्यारोप झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.