गुजरात राज्यातील पर्यटकांची थार गाडी खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना (Nandurbar Accident) घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जेव्हा ही गाडी खोल दरीत कोसळली तेव्हा यामध्ये तीन जण असल्याची माहिती मिळाली आहे. जखमीलाला उपचारासाठी गुजरात राज्यात नेण्यात आले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील होराफळी गावाजवळ ही घटना घडली.
(हेही वाचा –Worli Accident : BMW च्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी)
पर्यटनासाठी आलेले गुजरात राज्यातील तीन तरुण त्यांच्या थार या वाहनाने प्रवास करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांची थार गाडी ही थेट खोल दरीत जाऊन कोसळली. या भीषण दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. तर थार गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून जखमीला पुढील उपचारासाठी गुजरात राज्यात घेऊन गेले असल्याचे माहिती मिळाली आहे. (Nandurbar Accident)
(हेही वाचा –देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं; फडणवीसांचा संबंध नाही; Samit Kadam काय म्हणाले?)
या भागातील रस्ते वळणावळणाचे आणि जास्त उंची वरचे असल्याने या परिसरात दाट धुके पसरलेले असते. यात समोरची वाहन देखील आणि रस्ते देखील वेळप्रसंगी दिसत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडून येत असतात. त्यामुळे येथे येणाऱ्या तरुणांनी काळजीपूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे. (Nandurbar Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community