Ind vs SL, 2nd T20 : पावसाने व्यत्यय आणलेला सामना जिंकत भारताची मालिकेत २-० ने विजयी आघाडी

भारताला विजयासाठी ८ षटकांत ७८ धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं

151
Ind vs SL, 2nd T20 : पावसाने व्यत्यय आणलेला सामना जिंकत भारताची मालिकेत २-० ने विजयी आघाडी
Ind vs SL, 2nd T20 : पावसाने व्यत्यय आणलेला सामना जिंकत भारताची मालिकेत २-० ने विजयी आघाडी
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा दुसरा टी-२० (Ind vs SL, 2nd T20) सामना पावसामुळेच जास्त गाजला. आधी सुरुवात उशिरा झाली. त्यानंतर श्रीलंकेनं २० षटकांत १६१ धावा केल्यावर, भारतीय डावातील जेमतेम एक षटक झालं असताना पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. अखेर सामना डकवर्थ – लुईस नियमानुसार फक्त ८ षटकांचा करण्यात आला. भारताला ७८ धावांचं सुधारित लक्ष्य देण्यात आलं.

यशस्वी जयसवालने ३०, सूर्यकुमार यादवने २६ आणि हार्दिक पांड्याने नाबाद २२ धावा करत हे लक्ष्य आरामात पार केलं. ८ चेंडू आणि ८ गडी राखून भारतीय संघाने विजय मिळवला. त्याचबरोबरच मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. इतकंच नाही तर या विजयासह जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-२० मालिका जिंकण्याचा मानही पटकावला आहे. श्रीलंकन फलंदाजांच्या फळीला खिंडार पाडत भारताने पहिल्या डावातच विजयाच्या दिशेनं वाटचाल केली होती. (Ind vs SL, 2nd T20)

(हेही वाचा – Nandurbar Accident: गुजरातहून नंदुरबारला जाताना थार दरीत कोसळली आणि…)

खरंतर पहिल्या १५ षटकांत ३ बाद १३० अशी श्रीलंकेची भक्कम स्थिती होती. पण, आधी जम बसलेल्या कुशल परेराला हार्दिक पांड्याने ५३ धाावांवर बाद केलं. त्यानंतर आलं रवी बिश्नोईचं (Ravi Bishnoi) जादूई षटक. सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आधी बिश्नोईने दासुन शनाकाला शून्यावर बाद केलं. आणि पुढच्याच चेंडूवर विनिंदू हसरंगाचाही त्रिफळा उडवला. दोघाही फलंदाजांना बिश्नोईच्या चेंडूंचा अंदाजच न येऊन ते त्रिफळाचीत झाले.

(हेही वाचा – Worli Accident : BMW च्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी)

आणि तिथेच सामना भारताच्या बाजूने झुकला. ५ बाद १३० वरून श्रीलंकन संघाची अवस्था २० षटकांत ९ बाद १६१ अशी झाली. रवी बिश्नोईने २३ धावांत ३ तर हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. विजयासाठी ४८ चेंडूंत ७८ धावांचं आव्हानही सोपं नव्हतं. पण, जयसवाल, सूर्यकुमार आणि हार्दिक यांनी ४ षटकार आणि १३ चौकार मारत हे आव्हान पूर्ण केलं.

रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा मालिकेतील तिसरा टी-२० सामना ३० जुलैला होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.