उरणमधील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मनसे प्रवक्ते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत, असं ते म्हणाले.
(हेही वाचा –देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं; फडणवीसांचा संबंध नाही; Samit Kadam काय म्हणाले?)
“गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन बहिणींचे निर्घृण खून झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात. त्यांनी धर्मवीर-1 आणि धर्मवीर-2 असे दोन चित्रपट काढले. या दोन्ही चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरल्याचे दाखवण्यात आले आहे. उद्देश एकच की, आनंद दिघे साहेब कशाप्रकारे बहिणींचे रक्षण करायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही आनंद दिघे यांचे शिष्य आहात. तुम्ही राज्यातील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली.”
@mieknathshinde @Dev_Fadnavis साहेब… महाराष्ट्रातल्या बहिणींना आता लाडकी बहिण योजनेपेक्षा *सुरक्षित बहिण* योजनेची जास्त आवश्यकता आहे…#Maharashtra pic.twitter.com/Kgh8NMm7si
— Yogesh J Chile (योगेश चिले) (@chileyog) July 28, 2024
(हेही वाचा –Worli Accident : BMW च्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी)
“या योजनेच्या माध्यमातून बहिणींना महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. पण तुमच्या या लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपयांची गरज नाही. त्या पैसे कमावू शकतात. फक्त त्या जिथे पैसे कमवायला जातात, जिथे नोकरी करतात, जिथे शिक्षण घ्यायला जातात, तिकडे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. ही सुरक्षा तुम्ही दिली पाहिजे. त्यांना लाडकी बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार, हे महाराष्ट्र पाहणार आहे.” असे योगेश चिले यांनी व्हीडिओत म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community