Mumbai Sion Bridge: शीव रेल्वे उड्डाणपूलाबाबत मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! जरुर वाचा…

213
Mumbai Sion Bridge: शीव रेल्वे उड्डाणपूलाबाबत मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! जरुर वाचा...
Mumbai Sion Bridge: शीव रेल्वे उड्डाणपूलाबाबत मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! जरुर वाचा...

ब्रिटिशकालीन ११२ वर्षाचा शीव उड्डाणपूल (Mumbai Sion Bridge) जीर्ण झाल्याने तो पाडण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात सुरक्षेच्या कारणास्तव या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली. आता हा पूल सर्व वाहनांसाठी बंद केला जाणार आहे. १ ऑगस्टपासून पुलावरील वाहतूक बंद करून जुलै २०२६ पर्यंत या दोन वर्षाच्या कालावधीत नवीन पुलाची बांधणी पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

पुनर्बांधणीच्या कामादरम्यान जनतेला विद्यमान शीव आरओबीच्या दोन्ही बाजूला असलेले पर्यायी सार्वजनिक पादचारी पूलाचा (एफओबी) वापर करता येईल जे खालीलप्रमाणे आहेत. (Mumbai Sion Bridge)

  1. सार्वजनिक एफओबी (धारावी धोबीघाट एफओबी) शीव रुग्णालयाच्या (दक्षिण) दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर.
  2. शीव स्टेशनच्या कुर्ला (उत्तर) टोकाला सार्वजनिक एफओबी सुमारे ३५० मीटर अंतरावर.

रस्ता वापरकर्त्यांनी वाहतूक विभागाने जारी केलेल्या वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती केली जात आहे. हे महत्त्वाचे काम पार पाडण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे आणि होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे दिलगीरी व्यक्त करत आहे. प्रस्तावित नवीन उड्डाणपूल हा ‘सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स (२)’ ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा आहे. त्यासाठी साधारण २३ कोटी रुपये मध्य रेल्वे आणि २६ कोटी रुपये महापालिका उचलणार आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबईने (आयआयटी) त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये शीव उड्डाणपूल पाडण्याची आणि त्याजागी स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह नवीन उड्डाणपूल बांधण्याची शिफारस केली आहे. (Mumbai Sion Bridge)

तीन टप्प्यांत पाडकाम (Mumbai Sion Bridge)

– पहिल्या टप्प्यात विविध केबल हटवणे

– दुसऱ्या टप्प्यात पुलावरील स्लॅब, डांबरी रस्ता हटवणे

– अखेरच्या टप्प्यात ब्लॉक घेऊन गर्डर हटवणे

– पूल पाडण्यासाठी : पाच ते सहा महिने

– पूल पुनर्बांधणीसाठी : १८ महिने

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.