केकमधून गांजा : भारतात नशेचा नवा ट्रेण्ड!

एनसीबीने ब्रॉऊनी वीड पॉट केकद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करण्याचा एक नवीन ट्रेंड शोधून काढला आहे. ब्राऊनी तयार करताना त्यात खाद्यतेलाचा वापर करून त्यात गांजा मिक्स करून ते बेक केले जाते. भारतातील हे पहिले प्रकरण आहे.

130

भारतात अमली पदार्थाचे सेवन करण्याचा नवीन ट्रेंड समोर आला आहे. ‘गांजा’ हा अमली पदार्थ ब्राऊनी केकमध्ये टाकून त्याची तस्करी केली जात आहे. या ब्राऊनी केकची डिलीव्हरी मुंबईतील हायप्रोफाइल विभागात करण्यात येत होती. हायप्रोफाइल परिसरात राहणाऱ्या तरुणांमध्ये या ब्राऊनी केकला सर्वात अधिक मागणी होती, असे एनसीबीच्या चौकशीत समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने उघडकीस आणला असून मालाड येथील एका बेकरीवर रविवारी छापा टाकून गांजा मिश्रित ब्राऊनीचे दहा पॉट जप्त करण्यात आला असून ८३० ग्राम या ब्राऊनी केक मध्ये पोलिसांनी १६० ग्राम गांजा जप्त केला आहे.

मालाड ओरलेम या ठिकाणी बेकरीतून गांजा विक्री

एनसीबीला त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मालाड ओरलेम या ठिकाणी एका बेकरीतून गांजा विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने रविवारी छापा टाकून एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. एनसीबीने टाकलेल्या छापेत ८३०ग्रामच्या दहा ब्राऊनी केकचे पॉट जप्त करून तपासले असता त्यात एनसीबीला १६० ग्राम गांजा मिळून आला. या प्रकरणी एनसीबीने एल्स्टन उर्फ फर्नांडिस आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत गांजाने भरलेले ब्राऊनी केक पॉटचा पुरवठा वांद्रे जगत चौरसिया नावाचा व्यक्ती करीत आहे. पोलिसांनी रात्री उशिरा जगत चौरसिया याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून १२५ ग्राम गांजा मिळाला. जप्त केलेला गांजा हा सेंद्रिय गांजा असून भारतात या गांजाला सर्वात अधिक मागणी आहे.

(हेही वाचा : दाऊदला शह देण्यासाठी मुंबईत याची ‘मचमच’)

भारतातील हे पहिले प्रकरण!

एनसीबीने ब्रॉऊनी वीड पॉट केकद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करण्याचा एक नवीन ट्रेंड शोधून काढला आहे. ब्राऊनी तयार करताना त्यात खाद्यतेलाचा वापर करून त्यात गांजा मिक्स करून ते बेक केले जाते. भारतातील हे पहिले प्रकरण आहे. ज्यात खाद्यतेल केक बेकिंगसाठी वापरला जाते. सिगारेट मध्ये अथवा चिलीम मध्ये गांजा टाकून ओढण्यापेक्षा बेक केलेल्या ब्राऊनीतून गांजा घेतल्यामुळे जास्त काळ नशा टिकून असते असे एनसीबीने सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.