पुण्यात झिका विषाणूची (Pune Zika Virus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांचा तणाव वाढला आहे. पुण्यात झिकाचे आणखी ९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) पुणेकरांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पुणे महानगरपालिकेकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. (Zika Virus)
(हेही वाचा – Kolhapur heavy rain: कोल्हापूरला पुराच्या पाण्याचा फटका; यंदा २० लाख टन उत्पादन घटणार?)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले आहेत. तर अन्य ९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा ४८ वर पोहोचला आहे. या ९ रुग्णांपैकी ७ रुग्ण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वाघोली येथील असून, संबंधित रुग्ण हे पुणे ग्रामीण आणि पुणे कॅन्टोन्मेंट परिसरात राहणारे आहेत. (Zika Virus)
(हेही वाचा – Disabled : दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप)
या नव्या रुग्णांमध्ये शिवणे येथील २५ वर्षीय गर्भवती महिलेचा समावेश आहे. या महिलेला ताप, पुरळ, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्याने तिचे नमुने २२ जुलै रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. ही महिला २० आठवड्यांची गर्भवती आहे. अशामध्ये या नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील रक्त तपासणी केली जात आहे. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Zika Virus)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community