बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्यात येणाऱ्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार विस्थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विस्थापन भत्ता आता दरमहा २० हजार रूपये करण्यात आला आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्टेंबर २०२४ च्या मासिक वेतनात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या दोन महिन्यांच्या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे. (BMC)
सद्यस्थितीत महानगरपालिका सेवा सदनिकाधारक सफाई कामगारास विस्थापन भत्ता १४ हजार रूपये आणि दरमहा घरभाडे भत्ता अदा करण्यात येतो. या भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सप्टेंबर २०२४ च्या मासिक वेतनात जुलै व ऑगस्ट महिन्यांच्या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. (BMC)
(हेही वाचा – Hawkers Policy : फेरीवाल्यांच्या नगरपथ विक्रेता समितीवरील सदस्य निवडीकरता २९ ऑगस्ट रोजी निवडणूक)
घनकचरा व्यवस्थापन खात्यांतील सफाई कामगारांना जास्तीत जास्त सेवा निवासस्थाने उपलब्ध करण्यासाठी आश्रय योजने अंतर्गत कमाल ४ चटई क्षेत्र वापरून ४६ वसाहतीपैकी एकूण ३० वसाहतींचा पुनर्विकास महानगरपालिकेच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यात जास्तीत जास्त सफाई कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची (किमान ३०० चौफूट) सेवानिवासस्थाने देण्यात येत आहेत. या ३० ठिकाणांच्या सफाई कर्मचारी सेवानिवासस्थान वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी या ठिकाणी राहत असलेल्या महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यासाठी ‘विस्थापन भत्ता’ धोरण मंजूर करण्यात आले आणि त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community