शरद पवार हे आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत. आता ते आगीत तेल ओतत आहेत. नामांतर होऊन अनेक वर्षे झाली. आता तो मुद्दा कशासाठी काढला ? फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का ? शरद पवार हे जातीय तेढ निर्माण करत आहेत. नामांतराचा मुद्दा हा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. आता त्या मुद्द्याला ते ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. आरक्षण बचाव रॅली सोमवारी लातूर जिल्ह्यात दाखल झाली. निलंगा येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट आरोप केला आहे.
(हेही वाचा – Karnataka Congress : सरकारी योजनांच्या नावाखाली कर्नाटकात काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना देणार भरघोस पगार)
…तर आम्ही करू; बच्चू कडूंचा इशारा
दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरणाऱ्या बोगस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही गोळा करत आहोत. दिव्यांगासारख्या वेदनादायी घटकाचे आरक्षण हिसकावून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची चिरफाड आम्हीच करणार. यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार कमी पडलं तर आम्ही ते काम करू. दिव्यांग प्रमाणपत्र वापरून अनेक अधिकारी यांनी सरकारी नोकरीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम सुरू केले आहे. दिव्यांगासारख्या वेदनादायी घटकाचा आरक्षण हिसकावून घेणाऱ्यांवर कडक कारवाई सरकारन करणं अपेक्षित आहे. सरकार यात कमी पडलं तर ती कारवाई आम्ही करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.
ते सोमवारी लातूर जिल्ह्यातील देवणी येथील शेतकरी आणि कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते. ही सार्वत्रिक भावना असल्याचेही बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community