Paris Olympic 2024 : मनू व सरबज्योत यांची कांस्य पदकाची लढत आणि मंगळवारचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक

मुष्टीयुद्ध आणि कुस्तीच्या लढतीही मंगळवारपासून सुरू होत आहेत.

118
Paris Olympic 2024 : मनू व सरबज्योत यांची कांस्य पदकाची लढत आणि मंगळवारचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : मनू व सरबज्योत यांची कांस्य पदकाची लढत आणि मंगळवारचं भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

आत्मविश्वासाने भरलेली मनू भाकर (Manu Bhaker) ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या पदकाच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी सरबज्योतच्या साथीने ती १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मंगळवारी कांस्य पदकाची लढत खेळेल. इथं ती जिंकली तर एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू असेल. (Paris Olympic 2024)

फक्त नेमबाजीच नाही तर मुष्टियुद्ध आणि कुस्तीच्याही भारतासाठी महत्त्वाच्या लढती मंगळवारपासून सुरू होत आहेत. तर सांघिक अपयशानंतर भारतीय तिरंदाज आता एकेरी मुकाबल्यांसाठी सज्ज होत आहेत. मंगळवार ३० जूनचा भारतीय खेळाडूंचा कार्यक्रम पाहूया,

(हेही वाचा – Keral मध्ये पावसाचे थैमान; वायनाडमध्ये भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू)

नेमबाजी
१२.३० – पृथ्वीराज तोंडाईमानची ट्रॅप प्रकारातील पात्रता लढतीचा दुसरा दिवस (पहिल्या दिवशी पृथ्वीराज तिसाव्या स्थानावर)
१२.३० – श्रेयसी सिंग व राजेश्वरी यांच्या ट्रॅप प्रकारातील पात्रता लढती
१.०० – मनू भाकर व सरबज्योत सिंग यांची मिश्र दुहेरी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारातील कांस्य पदकाची लढत
७.०० – पृथ्वीराज तोंडाईमानची ट्रॅप प्रकारातील अंतिम लढत (पात्र ठरल्यास)
रोइंग
१.४० – पुरुष एकेरी स्कल्स प्रकारातील उपउपान्त्य लढत
हॉकी
४.४५ – भारतीय पुरुष संघाचा ब गटातील साखळी सामना, प्रतिस्पर्धी संघ – आयर्लंड


(हेही वाचा – झारखंडमध्ये Mumbai-Howrah Mail चा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले)


तिरंदाजी
५.१४ – अंकिता भकट वि. वियोलिता मायझर (एकेरीची बाद फेरी)
५.२७ – भजन कौर वि. साईफा कमाल (एकेरीची बाद फेरी)
५.५३ – अंकिता व भजन एकेरीची उपउपान्त्य फेरी (पात्र ठरल्यास)
१०.४६ – धीरज बोम्मदेवरा वि ॲडम ली (एकेरीची बाद फेरी)
११.२५ – धीरज बोम्मदेवराची एकेरी बाद फेरी (पात्र ठरल्यास)
बॅडमिंटन
५.३० – सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी यांचा गटवार साखळीतील शेवटचा सामना
६.२० – अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रेस्टो यांचा गटवार साखळीतील शेवटचा सामना
मुष्टीयुद्ध
७.१६ – अमित पनघल वि पॅट्रिक चियेंबा (बाद फेरी)
९.२४ – जस्मिन लाम्बोरिया वि. नेस्थी पेटेसियो (बाद फेरी)
१.२० – प्रीती पवार वि. येनी मार्सेला (बाद फेरी)


हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.