Paris Olympic 2024 : सात्विकसाईराज व चिराग शेट्टी ऑलिम्पिक उपउपान्त्य फेरी गाठणारी भारताची पहिली दुहेरी जोडी

सध्या सात्त्विक आणि चिरागची जोडी जागतिक क्रमवारीतही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

125
Paris Olympic 2024 : सात्विकसाईराज व चिराग शेट्टी ऑलिम्पिक उपउपान्त्य फेरी गाठणारी भारताची पहिली दुहेरी जोडी
Paris Olympic 2024 : सात्विकसाईराज व चिराग शेट्टी ऑलिम्पिक उपउपान्त्य फेरी गाठणारी भारताची पहिली दुहेरी जोडी
ऋजुता लुकतुके

बॅडमिंटनमधली भारताची दुहेरीतील आघाडीची जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी भारतीय बॅडमिंटनमध्ये पुन्हा नवा इतिहास रचला आहे. आणि ऑलिम्पिकची बाद फेरी गाठणारी ही दुहेरीतील पहिली भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी जागतिक क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल स्थान याच जोडीने पटकावलं होतं. सोमवारी या जोडीचा गटवार साखळी लढतीत मुकाबला होता तो जर्मन जोडी मार्क लाम्सफस आणि मार्विन सायडेल यांच्याशी. पण, सायडेलच्या दुखापतीमुळे जर्मन जोडीने या सामन्यातून माघार घेतली. आणि क गटातील आणखी एका लढतीत फ्रेंच जोडी ल्युकाल कारवी आणि रोनान लेबर यांचा पराभव झाला तेव्हा भारतीय जोडीची आगेकूच नक्की झाली. (Paris Olympic 2024)

सध्या भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. आणि कारवी, लेबर जोडीला त्यांनी आधीच्या साखळी सामन्यात हरवलेलं आहे. आणि जर्मन जोडीने माघार घेतल्यावर आता क गटात तीनच संघ राहिले आहेत. त्यापैकी कारवी, लेबर जोडीने २ सामने गमावले असल्यामुळे त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उर्वरित दोन संघ म्हणजे भारतीय आणि इंडोनेशियन संघ आता बाद फेरीत जातील. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Mahayuti : भाजपाकडून अजित पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न?)

जर्मन जोडीने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर ही जोडी बाद झाली आहे. आणि त्यांनी साखळीत खेळलेल्या आधीच्या लढतीचा निकालही आता रद्द झाला आहे. क गट हा तीन जोड्यांचाच धरला जाईल. सात्विकसाईराज आणि चिरागचा शेवटचा साखली सामना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता इंडोनेशियाच्या जोडीबरोबर होईल. (Paris Olympic 2024)

फ्रान्समधील बॅडमिंटन कोर्ट हे वेगवान आहे. इथं फुलाचा वेग जास्त असतो. आणि वेगवान खेळ करणाऱ्या सात्त्विक आणि चिराग यांच्या खेळाला हे कोर्ट पूरक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये भारतीय जोडीकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.