Manika Batra : टेबलटेनिसमध्ये अंतिम १६ मध्ये पोहोचणारी मनिका बात्रा पहिली खेळाडू

Manika Batra : मनिकाचं हे चौथं ऑलिम्पिक आहे.

89
Manika Batra : टेबलटेनिसमध्ये अंतिम १६ मध्ये पोहोचणारी मनिका बात्रा पहिली खेळाडू
Manika Batra : टेबलटेनिसमध्ये अंतिम १६ मध्ये पोहोचणारी मनिका बात्रा पहिली खेळाडू
  • ऋजुता लुकतुके

टेबलटेनिसपटू मनिका बात्राने (Manika Batra) भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टेबलटेनिस खेळात अंतिम सोळा जणांत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. त्यासाठी तिच्यापेक्षा क्रमवारीत अव्वल असलेल्या फ्रान्सच्या पृथिका पावडेचा तिने ४ गेममध्ये पराभव केला. खरंतर हा मुकाबला २९ वर्षीय मनिका आणि १९ वर्षीय पृथिका यांच्यातील होता. पण, इथं अनुभव आणि तडफ सरस ठरली.

मनिकाने प्रतिस्पर्ध्यांचा ११-९, ११-६, ११-९ आणि ११-७ असा सरळ चार गेममध्ये पराभव केला. पृथिका मूळ पुद्दुचेरीची आहे. पण, तिचे आई-वडील फ्रान्सला २००३ मध्ये स्थलांतरित झाले होते. (Manika Batra)

(हेही वाचा – Uran Love Jihad : आरोपी दाऊद शेख अखेर पोलिसांच्या जाळ्यात)

यापूर्वी शरद कमल (Sharath Kamal) टोकयो ऑलिम्पिकमध्ये अंतिम ३२ खेळाडूंमध्ये पोहोचला होता. आणि भारतीय टेबलटेनिसपटूची ही सर्वोत्तम कामगिरी होती. मनिका सध्या जागतिक क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे. आणि तिची प्रतिस्पर्धी पृथिका १७. पण, मनिकाने खेळावर त्याचा परिणाम जाणवू दिला नाही. उलट मनिकाच्या कामगिरीत निर्धार दिसत होता.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident प्रकरणी आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार)

पृथिका डावखुरी आहे. तर मनिकाने तिची आक्रमणाची बाजू नीट हाताळली. टेबलचा कोपरा पकडून तिथे सतत चेंडू टोलवत गेली. आणि पृथिकाला बॅडहँडने चेंडू परतवणं कठीण जात होतं. अखेर ती दडपणाला बळी पडली. पहिला गेमही ८-८ च्या बरोबरीनंतर मनिकाने असाच घेतला. खेळावर सतत आपलं वर्चस्व राहील याची मनिकाने काळजी घेतली. आणि यात ती यशस्वीही झाली. जवळ जवळ प्रत्येक गेममध्ये तिने पहिले तीन गुण सलग जिंकले. चौथ्या गेममध्येही पृथिकाच्या बॅकहँडने तिचा घात केला. आणि मनिकाचा विजय साध्य झाला.

या आधीच्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये मनिकाने अंतिम ३२ जणांमध्ये स्थान मिळवलं होतं. यावेळी तिने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.