Maratha Reservation : मातोश्रीबाहेर मराठा आंदोलन; उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे आंदोलक नाराज

168
Maratha Reservation : मातोश्रीबाहेर मराठा आंदोलन; उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे आंदोलक नाराज
Maratha Reservation : मातोश्रीबाहेर मराठा आंदोलन; उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे आंदोलक नाराज

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह इतरही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन खासदार शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आंदोलन केले.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : नदाल विरुद्ध जोकोविच सामन्यात जोकोविचची सरशी)

‘उद्धव ठाकरे जबाब दो !’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. 30 जुलैच्या दुपारी 12 वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या याच भूमिकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून मातोश्रीच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

या आंदोलकांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली. दानवे यांनी आंदोलकांची बाजू ऐकून न घेता त्यांनाच ही आंदोलनाची पद्धत नाही. तुम्ही वर्षा बंगल्यावर जा, सागर बंगल्यावर जा, असे सुनावले. ४-५ जण आलात, तर साहेब भेटतील, असे सांगून दानवे यांनी काढता पाय घेतला.

उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्याने आंदोलन

मराठा आंदोलकांच्या या भूमिकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने 29 जुलै रोजी मातोश्रीवर धडक दिली होती. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. मात्र सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला न भेटता उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडले होते. ठाकरेंची भेट न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मातोश्रीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करण्यात केले. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.